शिवाजी अध्यापक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 12, 2022

शिवाजी अध्यापक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

 शिवाजी अध्यापक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील शिवाजी अध्यापक विद्यालयात 1995 ते 1997 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल बडे होते. प्रमुख अतिथी म्हणून लालसिंग रजपूत, शिवाजी जाधव, आनंद काळे, सुभाष वाले आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुमारे 25 वर्षांनंतर भेट झाल्यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या सुखदु:खाची देवाणघेवाण केली. एकमेकांची मोठ्या आस्थेने विचारपूस केली. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सुनील चव्हाण, संतोष कांबळे, आप्पाशा उमराणी, वीरभद्र सुतार, शंकर पाटील, ज्योती जाधव, शीला अगसर, आशिष इंगळे आदींनी परिश्रम घेतले, हर्षदा जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages