जगातील गौरवशाली मातृत्वाची अत्युच्च शिखर- जिजाऊ
जिजाऊ जयंती निमित्त महिला पत्रकारांचा गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रमाता जिजाऊ यांचा 424 व्या जयंतीनिमित्त जुळे सोलापुरातील एस बी. प्राथमिक शाळा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ यांच्या प्रतिमेला सोलापुरातील महिला पत्रकारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनानेणे करण्यात आली सोलापुरातील दैनिक दिव्य मराठी च्या अश्विनी तडवळकर माधुरी कुलकर्णी संचार च्या सुनीता कुलकर्णी सकाळ च्या प्रमिला चोरगी सुराज्य च्या आरती कुसेकर या पाच महिला पत्रकार यांचा सन्मान मानाचा फेटा पुष्पगुच्छ व लेखणी देऊन करण्यात आला.
12 जानेवारी हा स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस हा सर्वांनी जिजाऊंचे विचार जोपासत जिजाऊ जन्मोत्सव घरा-घरात व गावा -गावात साजरा करून परिवर्तनाची ज्योत पेटवली सर्व विश्वाला प्रेरणा देणारा हा दिवस आहे असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चेतन वाडदेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, प्राजक्ता बागल अरविंद शेळके, उपप्रमुख सिताराम बाबर, बसवराज आळंगे, सुलेमान पिरजादे, सागर देवकुळे, धीरज साबळे, राहुल सावंत, इलियास शेख,सुनील निकम दत्ता डिंगने महेश माने सचिन मोरे मानसी गोरे ईत्यादी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ च्या वेषभूषातील श्रद्धा मठपती सृष्टी पाटील नंदिनी भोज व धैर्य गोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment