वृक्ष संवर्धन समिती तर्फे फळझाडांच मोफत वाटप
बार्शी (कटूसत्य वृत्त):- संक्रातीला वान म्हणुन देण्यासाठी प्लास्टीक च्या वस्तु ऐवजी पर्यावरण पुरक अशा वस्तु दान दिल्या पाहिजेत हा उद्देश ठेवुन तसेच या बद्दलची लोकजाग्रुती महिलांमध्दे व्हावी यासाठी पुढाकार घेत वृक्ष संवर्धन समिती च्या वतीने महिलांना फळाची व फुलाची रोपे मोफत वाटप करण्यात आली.राजमाता जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधुन हा उपक्रम घेण्यात आला याला महिलांनी प्रचंड प्रतीसाद दिला.या वेळी एकहजार रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्त्री रोगतज्ञ डॉ.सौ.गौरी गायकवाड यांनी भुषवीले तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन अँड.सौ राजश्री डमरे तलवाड,सौ.सुवर्णा शिवपुजे,सायरा मुल्ला,अजित कुंकुलोळ,संजय बारबोले,अरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद,गणेश भोळे,धैर्यशिल पाटिल,बळप साहेब,माझी वसुंधराचे गणेश पाटिल,प्रा.धोत्रे सर,दास मस्के,वसंत हवालदार,विजय राऊत,गणेश गोडसे,सौ.गायकवाड ताई,सौ.बोरगावकर ताई,सौ स्नेहा मदने, रुषिकांत पाटिल, महेश देशमुख,सुनिल अवघडे,संदिप मठपती,धिरज शेळके आदी उपस्तिथ होते. या वेळी बोलताना डॉ सौ गौरी गायकवाड यांनी समितीच्या सर्वच उपक्रमाचे कौतुक केले त्या म्हणाल्या की वृक्ष संवर्धन समितीने फक्त एकाच भागात झाडे लावली नसुन शहरातील प्रत्तेक भागात ती लावली आहेत व फार काळजी पर्वक ती वाढवत आहेत प्रत्तेक बार्शीकराला अभिमान वाटावा अस उल्लेखनिय काम समितीतील सर्व सदस्य करत आहेत.या वेळी पत्रकार संघ बार्शीच्या नवनिर्वाचित सर्वच पदाधिकार्यांचा सन्मान वृक्ष संवर्धन समिती मार्फत करण्यात आला तसेच रोपे उपलब्द करुन दिल्या बद्दल नारायण सुर्वे व सागर लामकाने यांचाही सत्कार या वेळी मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश काळे,सचिन शिंदे,राणादादा देशमुख,राहुल तावरे,अमृत खेडकर,महेश बकशेट्टी,शशी पोतदार,बाबासाहेब बारकुल,राहुल काळे,अक्षय भुईटे,योगेश गाडे,हर्षद लोहार,सौ सुलक्षणा नलवडे ताई,कु.साक्षी बलदोटा,कु.पृथाराणी देशमुख,सौदागर मुळे,उदयकुमार पोतदार,
सुनिल फल्ले,संतोष मस्के आदींनी परीश्रम घेतले.प्रस्ताविक उमेश नलवडे व सुत्रसंचालन अतुल पाडे यांनी केले.
No comments:
Post a Comment