सोलापूरात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. 27 डिसेंबर रोजी हा रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. 30 डिसेंबर रोजी त्याचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी दिली. सोलापूर महापालिकेच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. संबंधित रूजण हा 27 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अश्विनी रुग्णालयात तो उपचार घेत होता. त्याचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याना मुंबईत पाठविण्यात आले होते. 30 डिसेंबर रोजी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईला रवाना केले होते. त्यानंतर तेथून 2 जानेवारी रोजी त्याना घरी पाठविण्यात आले. या व्यक्तीच्या संपर्कातील एक व्यक्तीदेखील पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाचे सुटकेचा निश्वास टाकला असला तरी मोठ्याप्रमाणात काळजी घेतली जात आहे.
सोलापुरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भिती पसरू नये यासाठी मनपा प्रशासनाने मोठ्याप्रमाणात याची गुप्तता पाळली होती. दरम्यान आज सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ओमायक्रॉन बाधित झालेला हा रुग्ण आता उपचार घेऊन सुखरूप बाहेर पडल्या असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सदर व्यक्तीचा आयसोनेशनचा कालावधी संपला असून त्याची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा फैलाव होणार नाही. सुरुवातीच्या पहिल्या तीन दिवसातच त्याचा फैलाव होऊ शकतो. मात्र सदर व्यक्तीपासून कोणत्याही प्रकारचा फैलाव होण्याची शक्यता नसल्याचे आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी सांगितले. कोव्हिड नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे सोलापूरकरांनी नियमांचे पालन करावे. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळे केले.
No comments:
Post a Comment