जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी
कोंडी (कटूसत्य वृत्त):- जाणता राजा बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे कोरनाचे नियम पाळून मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊ लेक विराक्षी नीळ आणि दिव्या गुंड यांच्या हस्ते जिजाऊंचे प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रा.सदाशिव पवार होते .संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका पूनम कापसे आदींनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .
यावेळी जिजाऊ ज्ञान मंदिरातील चिमुकल्यांनी 'जय जिजाऊ जय शिवराय'अशा गगनभेदी घोषणा दिल्या. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील ज्योती वाघमारे ,स्नेहा माळी व प्राची जाधव यांनी जिजाऊंचे चरित्र आपल्या भाषणातून उलगडून दाखवले. पूजा शिंदे, दिव्या गुंड या मुलींनी जिजाऊची वेशभूषा करत उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले. या शिवाय जिजाऊ संकुलातील बालचमुनि ऑनलाइन भाषण करत जिजाऊंना मानवंदना दिली विराक्षी निळ, दिव्या गुंड, पूजा शिंदे आदींनी आदींनी सुंदर वेशभूषा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक गणेश निळ म्हणाले, ज्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान नव्हते त्या काळात राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याची स्वप्न पाहिले आणि स्वराज्याचा ठेवा शिवरायाच्या रूपाने दिला. आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली .आजच्या तरुणांनी राजमाता जिजाऊंचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत ची माहिती सेकंदात समजते. त्यामुळेच या अद्ययावत तंत्रज्ञानाचा आजच्या विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून जिवनाला दिशा द्यावी. मोबाईल चा वापर चांगल्या साठीच करावा असं त्यांनी भाषणा च्या समारोपा प्रसंगी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सदाशिव पवार म्हणाले,आयुष्य सुंदर आहे आयुष्य नुसतं मौजमजेसाठी मिळालं नसून आजच्या तरुणांनी शिक्षणातून आपला सर्वांगीण विकास घडवून आणणे गरजेचे आहे. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून अभ्यास करण्याची गरज आहे .तरच या थोर जयंत्या साजरा केल्याचे सार्थक होईल. महापुरुषांनी दाखवलेल्या विचार वाटेवरून चालत राहिला पाहिजे, तरच आपला भविष्यकाळ घडणार आहे या प्रसंगी प्राचार्य सुषमा निळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी पुनम कापसे ,काटे S.P. कोथकुंडे R.V., मोरे S.K. माने M.B. मसलकर V.B.अश्विनी नीळ, औरादे मॅडम आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment