माढा तालुक्यातील ९३ बचत गटांना १ कोटी २५ लाखांचे धनादेश वाटप.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 29, 2022

माढा तालुक्यातील ९३ बचत गटांना १ कोटी २५ लाखांचे धनादेश वाटप.!

 माढा तालुक्यातील ९३ बचत गटांना १ कोटी २५ लाखांचे धनादेश वाटप.!






महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय निर्मिती करून त्याचे मार्केटिंग करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. माढा तालुक्यातील ९३ बचत गटांना १ कोटी २५ लाख रुपयांचे धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते कुर्डूवाडी येथील माढा पंचायत समितीच्या आमदार कै.विठ्ठलरावजी शिंदे सभाग्रहात उमेदच्या वतीने बचत गटामधील महिलांना कर्ज वितरण करण्यात आले.याप्रसंग स्वामी हे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रमदादा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे,सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील,जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे,बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक प्रशांत नाशिककर,विश्वास वेताळ,मिनाक्षी मडीवळी,अमोल सांगळे, पंचायत समिती प्रशासन अधिकारी सयाजी तालुका आरोग्य अधिकारी शिवाजी थोरात, महेश शेंडे आदी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले,उमेद अभियानाचे जिल्ह्याचे १६० कोटी उद्दिष्टांमधील १३३ कोटीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.उदिष्ट पूर्ततेपेक्षा महिलांच्या संसाराला हातभार लागला याचा जास्त आनंद आहे.बचत गटाच्या महिलांनी दिलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेत पत निर्माण करावी.आज बचत गटांना कर्ज देण्यामध्ये बँका सकारात्मक आहेत.लसीकरणात उमेद अभियानातील महिलांचे योगदान आहे.बचत गटाच्या अडचणीवर लक्ष असून त्याच्यावर मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न केले जातील.त्यामुळे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे असल्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य आंधळकर,तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख,शरद सातपुते,कृष्णा लोंढे,सुषमा बिचुकले,गणेश दोरवट,स्वप्निल सुर्वे व सुदर्शन यादव यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages