Hot Posts

6/recent/ticker-posts

काँग्रेसचे युवा नेते अजयसिंह इंगवले-पाटील यांचा वाढदिवसानिमित्त माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वतीने सत्कार संपन्न

 काँग्रेसचे युवा नेते अजयसिंह इंगवले-पाटील यांचा वाढदिवसानिमित्त माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वतीने सत्कार संपन्न



सांगोला (कटूसत्य वृत्त):-  काँग्रेसचे युवा नेते, जिल्हा कार्यकारणी सदस्य अजयसिंह इंगवले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनीही अजयसिंह इंगवले यांचा सत्कार केला.
         महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य अजयसिंह इंगवले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष सुनील भोरे, महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विश्वजीत हाप्पे, सांस्कृतिक विभागाचे  राज्य उपाध्यक्ष महादेव कांबळे,  जिल्हा सरचिटणीस अभिषेक कांबळे, विजयसिंह सुरवसे, तालुका सांगोला तालुक्यात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष बाळगे सर यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुनिताताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार, सुदर्शन अवताडे, दत्ता टापरे, अरविंद केदार, सरपंच अमोल पाटील इंजिनीयर रमेश जाधव, अंकुश लिगाडे, अनिल बाबर, युवक काँग्रेसचे अजित चव्हाण, नागेश जाधव विजयकुमार सूर्यवंशी, डॉ.प्रशांत तेली, विजयकुमार इंगवले-पाटील यांनीही अजयसिंह इंगवले पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
      सोलापूर येथे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अजयसिंह इंगवले यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

Reactions

Post a Comment

0 Comments