मुलींसाठी सायकल बँक तर वृद्धांसाठी नाना-नानी पार्क तयार करा :आ.बबनदादा शिंदे
निमगावात एक कोटी च्या विकास कामांचे लोकार्पण.! सरपंच यशवंत शिंदे यांचे कार्य कौतुकास्पद.!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- शाळेसाठी नविन ईमारत तर एकाच ठीकाणी ग्रामसचिवालय बांधा,गरीब मुलींसाठी सायकल बँक निर्माण करा,नविन जागेत वृद्धांसाठी नाना-नानी पार्क तयार करा,गावत कोरोना लसीचे १००℅ लसिकरण करा,याबरोबरच गावातील दारू पिणा-यावर व विकणा-यावर बंदी घाला असे प्रतिपादन करित सरपंच यशवंत शिंदे यांच्या कामाचे कौतुकही आ.बबनराव शिंदे यांंनी केले आहे.
यावेळी व्यासपिठावर आ.संजयमामा शिंदे,जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे,पं.स.सभापती विक्रमसिंह शिंदे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सविताताई संजयमामा शिंदे,गार्गी यशवंत शिंदे,भारती शिंदे,माजी सरपंच रविंद्र शिंदे, सहाय्यक गटविकासअधिकारी प्रताप पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.शिवाजी थोरात,न.पा.आरोग्य अधिकारी तुकाराम पायगण,उपअभियंता एस.जे.नाईकवाडी,शाखा अभियंता राहुल डेंगळे,युवक काँग्रेसचे धनंजय मोरे,शशिभाऊ शिंदे,ग्रामसेवक रामभाऊ मिटकल,मंडळ अधिकारी सुर्यकांत डिकोळे,तलाठी लक्ष्मण,अंबाड तलाठी सतिष भंडारे,पिंपळणेर निलेष मुरकुटे,दहीवली सहदेव काळे,सामुदय आरोग्य अधिकारी डाँ. दिपक भोसले,आरोग्य सेविका मनिषा खोचरे उपस्थित होते. पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले ",कोरोना काळात सरकार अडचणीत असल्यामुळे निधीची कमतरता होती.मात्र आत्ता कोणतीही अडचण नसून निमगाव (टें) ला जोडणारे पिंपळणेर,बादलेवाडी,शेडसिंगे,
",गावासाठी कोणतेही काम मागा,मी देण्यास तयार आहे पाणंद रस्ते यासह शेतातील रस्तेही यापूडच्या काळात रस्तेसाठी निधी दीला जाईल फक्त कामे प्रामाणीकपणे व दर्जेदार करूण घ्यावीत असे आ.संजयमामा शिंदे यांनीआपल्या भाषणात बोलताना सांगीतले.
या कार्यक्रमात जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे,डाँ. शिवाजी थोरात,आरोग्य अधिकारी तुकाराम पायगण,ग्रामसेवक रामभाऊ मिटकल,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पत्रकार सोमनाथ शिंदे,अश्वीनी गरड यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सरपंच यशवंत शिंदे व गार्गी शिंदे यांचा विकासात्मक कामे केल्याबध्दल नागरी सत्कार तर गावात सुरवाती पासुन निवृत्ती पर्यंत पोष्टमनची सेवा देणारे आशोक भोसले,तर उत्तम आरोग्य सेवे बध्दल उपकेंद्राचे डाँ.भोसले व सर्व सहका-यांचा तसेच गावालगत तालीम बांधणीसाठी तिन गुठे जागा विनामुल्य देणा-या दिलदार शेतकरी दादा चट्टे यांचा आ.बबनराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी ग्रामपंचायत सदस्य प्रताप शिंदे,उदय शिंदे,न्यायनिवाडा सदस्य सुनिल खापरे,सुनिल शिंदे,विकास शिंदे,चिंटू पाटील,सुरेश शिंदे,युवराज शिंदे,विजेंद्र शिंदे,संतोष गरड,बाळु शिंदे,बालाजी मेहेर,अविनाश काशिद,श्रिकांत चौधरी,गणेश कवडे,राहुल ईंगळे,अजिनाथ शेंडे,भाऊ शिंदे,अमोल सातपुते,अभिजीत परबत,दादासाहेब शिंदे,गणेश गुरव,लहु मांडवे,शंभू लों,गणेश खंडाळे,मनोज खंडाळे,शिवराज कुंभार,संदीप लोहार,रणजित भोसले,संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मल्हाव व्ही.डी.यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल कुंभार यांनी केले.
0 Comments