Hot Posts

6/recent/ticker-posts

शासनमान्य ग्रंथपालन वर्ग २०२५ प्रवेशासाठी आवाहन

 शासनमान्य ग्रंथपालन वर्ग २०२५ प्रवेशासाठी आवाहन


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघामार्फत चालविल्या जाणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे वर्ग चालविण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या वर्गात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यालय हुतात्मा स्मारक, मार्कंडेय उदयान, अशोक चौक, पोलीस चौकी समोर, सोलापूर येथे संपर्क करावा.

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील सेवकांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. उमेदवारासांठी १२ वी चे गुण हेच प्रमुख निकष असतील. सदर वर्ग जानेवारी २०२५ ते जुन २०२५ या ६ महिन्याच्या कालावधीचा असेल. प्रवेश ग्रंथालय संचालक मुंबई, पुणे विभाग ग्रंथालय संघ, पुणे आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर यांच्या प्रचलित नियम अटीनुसार होतील. हायस्कुल, कनिष्ठ महाविदयालय, सार्वजनिक वाचनालय, हॉस्पीटल येथे ग्रंथपाल म्हणून काम करण्यासाठी हा कोर्स आवश्यक आहे. डी.एड. समकक्ष हा कोर्स आहे. प्रवेशासाठी मो.नं. ९४०४६६६४८८ व ७३५०९२२२७६ वर संपर्क करावा असे आवाहन वर्ग व्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केले आहे.

प्रवेश आवाहन 
    ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा (LTC)२०२५ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा, अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. मो.  9404666488/ 7350922276/8308178551
 आवश्यक कागदपत्र (सर्वांची झेरॉक्स)
१) बारावीचे गुणपत्रक 
२) टीसी 
३) आधार कार्ड 
४) ३फोटो                                       
महत्त्व:-डी.एड.स्केल,आदिवासी प्रकल्प कार्यालय,रेल्वे,विविध महामंडळ,खाजगी/सरकारी शाळा,महाविद्यालय,वाचनालय, सरकारी दवाखाने,जेल, न्यायालये,इ.विविध संधी, 

पद/पदनाम:- ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथालय सेवक, निर्गम सहाय्यक, ग्रंथालय परिचर, इ.
 
टीप:-प्रमाणपत्र परीक्षा कोर्स कालावधी जानेवारी ते जून
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर  द्वारा हुतात्मा सार्वजनीक वाचनालय, हुतात्मा स्मारक, अशोक चौक पोलीस चौकी समोर, सोलापूर
Reactions

Post a Comment

0 Comments