Hot Posts

6/recent/ticker-posts

काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अॅड.मिनलताई साठे यांची निवड,नगरपंचायत वर सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा,कामाची काँग्रेस कडुन घेतली दखल

 काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अॅड.मिनलताई साठे यांची निवड,नगरपंचायत वर सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा,कामाची काँग्रेस कडुन  घेतली दखल




माढा (कटूसत्य वृत्त):- जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा नगरसेविका अॅड.मिनलताई दादासाहेब साठे यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या  उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
माजी केद्रींय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.साठे यांची निवड जाहीर झाली.माढा नगरपंचायत वर काॅग्रेस पक्षाचा बहुमताचा झेंडा फडकावण्यात अॅड.मिनल साठे यांचा  सिंहाचा वाटा आहे.मिनल साठे या नगरपंचायत मध्ये कर्तव्यदक्ष कारभार पाहत आल्या असुन प्रियदर्शनी महिला मंडळांच्या माध्यमातुन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत.नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद सांभाळण्याबरोबरच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद  देखील सक्षमपणे सांभाळले.एकंदरीतच अॅड. मिनल साठे यांच्या कामाची दखल घेत  त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी  निवड केली आहे.माढ्यातील महिलांकडुन विशेष अभिनंदन  करुन अॅड.मिनल साठे यांचे सत्कार केले जाताहेत.काॅग्रेस पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष कार्यक्रम उपक्रम राबवले जाणार आहेत.महिलांचे संघटन करुन काँग्रेसच्या ग्रामीण भागात शाखा उघडणार आहे.ग्रामीण भागात कॉग्रेसची  ताकद उभी करणार आहे.-अॅड.मिनलताई साठे,जिल्हा नियोजन समिती सदस्या

Reactions

Post a Comment

0 Comments