अनगर नगरपंचायतीची लोकसंख्या १५ हजार ६५० एवढी असून, १७ प्रभागातून १७ नगरसेवक निवडले जाणार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नव्याने स्थापन झालेल्या अनगर नगरपंचायतीसाठी एक सदस्यीय पद्धती लागू आहे. या नगरपंचायतीची लोकसंख्या १५ हजार ६५० एवढी असून, १७ प्रभागातून १७ नगरसेवक निवडले जाणार आहेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे.प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती
व सूचना मागवण्यासाठी दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यावर दि. ८ सप्टेंबर रोजी
सुनावणी घेण्यात येणार आहे.प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना दि. ११ सप्टेंबरपर्यंत नगर विकास विभागास सादर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना दि. ३० सप्टेंबरपर्यंत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
प्रभागनिहाय लोकसंख्या व परिसर
प्रभाग - १ : लोकसंख्या - १०१३
प्रभागात समाविष्ट भाग माळी
वस्ती स्टेशन रोड धायगुडे वस्ती.
प्रभाग २: लोकसंख्या- ८४७
समाविष्ट भाग - आढीव वस्ती
पाचपुंड वस्ती सहा नाला
प्रभाग ३ : लोकसंख्या- ८८२
समाविष्ट भाग - अंबुथळ वस्ती जि.
प. प्रा. शाळा मुले व मुली अनगर
प्रभाग ४ : लोकसंख्या- ९०७
समाविष्ट भाग- मारुती मंदिर
दत्तमंदिर तटाचा वाडा गोडावून
कुलकर्णी गल्ली
प्रभाग ५: लोकसंख्या- ८३४
समाविष्ट भाग - वाणी गल्ली,
घाटुळे किराणा,
गणेश गुंड हॉस्पिटल
प्रभाग ६ : लोकसंख्या- ८३२
समाविष्ट भाग अरुण नरखेडकर
कापड दुकान, विठ्ठल मंदिर
प्रभाग ७: लोकसंख्या- ८३३
समाविष्ट भाग- गणेश मंदिर,
लोकनेते खवा मिल्क अँड डेअरी
बँक ऑफ बडोदा अनगर
प्रभाग ८ : लोकसंख्या- ८३०
समाविष्ट भाग - शंकर नगर,
प्राथमिक आरोग्य केंद्र अनगर
प्रभाग ९ : लोकसंख्या ८४०
समाविष्ट भाग - अनगरसिद्ध मंदिर,
बनशंकरी मंदिर
प्रभाग १० लोकसंख्या
७१.९
समाविष्ट भाग आंब्याचा मळा,
कै. शं. बा. पाटील विद्यालय अनगर
प्रभाग - ११ : लोकसंख्या- ९९८
समाविष्ट भाग- कोंबडवाडी
प्रभाग - १२ : लोकसंख्या- ९९३
समाविष्ट भाग- महादेव मंदिर,
खंडोबा मंदिर.
प्रभाग - १३ : लोकसंख्या - ११०२
समाविष्ट भाग - मोहन गुंड यांचे दूध
संकलन केंद्र, गुंड वस्ती मांगोबा
प्रभाग १४ : लोकसंख्या - ११०२
समाविष्ट भाग नालबंदवाडी
प्रभाग - १५ : लोकसंख्या - ८६९
समाविष्ट भाग - मोडावस्ती,
पवारवस्ती, कोळेकरवस्ती,
भांडवस्ती, कुरणवाडी (अ)
प्रभाग १६ : लोकसंख्या - १०८४
समाविष्ट भाग - मोडावस्ती.
पवारवस्ती, कोळेकरवस्ती,
भांडवस्ती, कुरणवाडी (अ)
प्रभाग १६ : लोकसंख्या - १०८४
समाविष्ट भाग - निखलेश्वर
इलेक्ट्रिकल कुरणवाडी (अ),
जगतापवस्ती (कुरणवाडी),
कुरणवाडी गावठाण
प्रभाग १७ : लोकसंख्या - ८३३
समाविष्ट भाग - लोकनेते कारखाना
लोकरे वस्ती.
0 Comments