Hot Posts

6/recent/ticker-posts

सोहाळे गावातून २० गाड्या मुंबईला जाणार

 सोहाळे गावातून २० गाड्या मुंबईला जाणार




कामती (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, येत्या २९ ऑगस्टपासून मुंबई येथे मोठे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील विविध गावांत नियोजन बैठका घेतल्या जात आहेत.सोहाळे (ता. मोहोळ) येथे चावडी बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईला जाण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले. दरम्यान, सोहाळे गावातून २० गाड्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.या बैठकीसाठी अॅड. श्रीरंग लाळे, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नाईकनवरे,बालाजी जगताप, पप्पू रणदिवे, नागेश जगताप यांच्यासह सोहाळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
Reactions

Post a Comment

0 Comments