Hot Posts

6/recent/ticker-posts

ओबीसींच्या शैक्षणिक सवलती मराठा विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात : प्रा. झोळ

 ओबीसींच्या शैक्षणिक सवलती मराठा विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात : प्रा. झोळ




कोर्टी (कटूसत्य वृत्त):- इतर मागासवर्गीय प्रवर्ग (ओ.बी.सी.) लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू कराव्यात, असे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी आज दिले.तसेच एस.ई.बी.सी. व ओ.बी.सी.विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, यासंबंधीचा शासन निर्णय लवकरात लवकर काढावा, अशी विनंती प्रा. झोळ यांनी ना. विखे-पाटील यांना केली. यावेळी या निवेदनातील दोन्हीही मुद्द्यांवर व जात पडताळणीसाठी ६ महिन्याची मुदतवाढ देणे हे प्रश्न तात्काळ मार्गी लावू, असे आश्वासन ना. विखे-पाटील यांनी दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments