Hot Posts

6/recent/ticker-posts

विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव व्याख्यानमाला

 विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव व्याख्यानमाला




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गुरुवार, दि. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन, अक्कलकोट येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोटकरांसाठी नामवंत व्याख्यात्यांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत पाहिले पुष्प गुरुवार, दि. २८ ऑगस्ट रोजी विनायक खोत हे 'महाराष्ट्रातील गड व किल्ले', दुसरे पुष्प शुक्रवारी डॉ. धनंजय देशपांडे हे 'सायबर फ्रॉड हनीट्रॅप व आपण',तिसरे पुष्प रश्मी देव या 'देवी' पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांवरील नाटीका सादर करणार आहेत.
चौथे पुष्प रविवारी 'आनंदडोह' या विषयावर राजयोग निर्मित स्नेह पुणे हे संत तुकारामांवरील नाटीका सादर होईल. सादरकर्ते योगेश सोमण असतील. पाचवे पुष्प सोमवारी गायक स्वप्नील रास्ते यांचा 'उत्सव लोकगीतांचा' सहावे पुष्प मंगळवारी 'श्वासात राजं ध्यासात राजं' !!

कलाकार : अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, अवधूत गांधी हे सादर करतील तर सातवे पुष्प बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी 'ऑपरेशन सिंदूर ! पराक्रम अभूतपूर्व' व्याख्याते एअर मार्शल प्रदीप बापट, सेवानिवृत्त विंग कमांडर अविनाश मुगळ सेवा गुंफणार आहे. सर्व व्याख्याने सायंकाळी ६.३० वाजता सुरु होणार आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments