सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीस मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून,
येत्या ३० जून २०२६ पर्यंत दाखले काढून घेता येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्यास अनुसरून वंशावळ कार्यवाही होते. ही कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीची मुदत ३० जून २०२५ रोजी संपली होती. आता या समितीस पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
४८ हजारजणांना कुणी प्रमाणपत्र
जिल्ह्यातील ४८ हजार ९५६ जणांना मराठा कुणबी प्रामणपत्रे देण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर २०२३ ते २० मे २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील २५ शासकीय विभागातील ९२ लाल ५ हजार ४०८ नोंदणी तपासण्यात आली. यात ४८ हजार ९४६ जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहे.
0 Comments