नऊ मंडळांकडून डीजेमुक्तीची शपथ पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्याचा निर्णय
मोहोळ : (कटूसत्य वृत्त):- दैनिक 'पुढारी'ने सुरू केलेल्या डीजेमुक्त गणपती उपक्रमास सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. डीजेमुक्त गणेश मिरवणुकीसाठी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे मोहोळ
पोलिसांच्या पुढाकारातून नऊ मंडळांच्या अध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत या सर्व मंडळांच्या अध्यक्षांनी डीजेमुक्त मिरवणूक काढण्याची शपथ घेतली.
यावेळी मोहोळ पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस अधिकारी अंजना फाळके यांनी बैठकीत डीजेच्या दुष्परिणामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पैशाचा अपव्यय टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले. त्यांनी यावेळी डीजेमुक्त गणपती मिरवणूक काढण्याची शपथ मंडळाच्या
अध्यक्षांना दिली. नऊही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे डीजे कोणत्याच उत्सवात लावणार नाही असे सांगितले. यावेळी गावातील पवनपुत्र गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप विटकर, शिव-गणेश तालीम गणेश तरुण मंडळ अध्यक्ष नामदेव नीळ, शिव मल्हार गणेश तरुण मंडळ अध्यक्ष अण्णा सरवदे, जय शंकर गणेश तरुण मंडळ अध्यक्ष पांडुरंग घोडके, तरटे वस्ती गणेश तरुण मंडळ अध्यक्ष डीजेमुक्त सोलापूर नामदेव गुंड, मोरया गणेश पुढारी तरुण मंडळ अध्यक्ष अमित कवितके, वावर टावर गणेश
तरुण मंडळ अध्यक्ष दादा गावडे, ब्रम्हनाथ गणेश तरुण मंडळ अध्यक्ष सुभाष पुजारी, यशवंत फायटर्स गणेश तरुण मंडळ अध्यक्ष अहमद पठाणसह ग्रामपंचायत सदस्य दादाराव लांडगे, पोलिस कॉन्स्टेबल आनंद डौले, पोलिस पाटील चंद्रकांत गुंड, संदीप राऊत यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्तीथी होते.
चौकट
दै. 'पुढारी'चे सर्व स्तरातून कौतुक
दै. 'पुढारी' ने डीजे विरोधात
सर्वप्रथम आवाज उठविला.
त्यामुळे सोलापूर शहरच नव्हे तर
ग्रामीण भागातही जागृती होऊ
लागली आहे. याचा उल्लेख
आवर्जून बैठकीत अधिकारी व
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
त्यामुळे आता पुन्हा पारंपरिक
मिरवणुका सुरू होणार आहेत.
0 Comments