Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपुरातून हजारो युवक मराठा आंदोलनात दाखल

 पंढरपुरातून हजारो युवक मराठा आंदोलनात दाखल


पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंढरपूर व माढा तालुक्यातील हजारो मराठे आ. अभिजित पाटील, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या

उपस्थित हजारो वाहनांद्वारे गुरुवारी सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झाले.


पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज एकत्रित येत एक मराठा लाख

मराठा, अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.


आ. अभिजित पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे हे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात पंढरपूर व माढा मतदारसंघातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक सहभागी होत आहेत. या युवकांना सोबत घेऊन आपण मुंबईला रवाना होत आहे. मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीची सरकारला आठवण करुन दिली. तसेच ऐन सणासुदीचे दिवस पाहता सरकारने

विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments