दलित महासंघाच्या गौरव पुरस्कारांचे वितरण; मान्यवरांची उपस्थिती
बार्शी : (कटूसत्य वृत्त):- पुरस्कार म्हणजे चांगलं काम करणाऱ्यांना बळ देणे आणि चांगलं काम समाजासमोर मांडणे, जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन माजी आ. राजेंद्र राऊत यांनी केले.
ते दलित महासंघाच्या वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दलितमित्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी तहसीलदार आर. एफ. शेख, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय यादव, खजिनदार जयकुमार शितोळे, वकील संघांचे अध्यक्ष अॅड. रणजित गुंड, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, शहराध्यक्ष संदीप आलाट, शंकर वाघमारे, विजय साळुंखे, निलेश खुडे, संगीत शिंदे, अमोल कांबळे, संतोष बगाडे,
हरिश्चंद्र कांबळे, रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले की, मी आमदार असताना अधिकारी आणताना अगोदर माहिती घ्यायचो म्हणून आपल्याला तहसीलदार, मुख्याधिकारी यासारखे कामाचे अधिकारी मिळाले. दलित महासंघाचे हे पुरस्काराचे सलग अठरावे वर्ष असून, हा पुरस्कार १०२५ वितरण समारम म्हणजे दलित महासंघाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
यावेळी श्रीधर कांबळे, प्रा. विशाल गरड यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक सुनील अवघडे यांनी केले. सूत्रसंचालन नीता देव यांनी केले. संदीप आलाट यांनी आभार मानले.
यावेळी श्रीधर कांबळे लिखित व संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून दलित महासंघाचे एंथम साँग
'एकच संघ दलित महासंघ' हे गीत व शाहीर राजेश ननवरे यांनी गायलेले 'वालु आईचं पोर, लय दिमाग बाज हे' गीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
चौकट
यांना मिळाला पुरस्कार
मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, प्रा. विशाल
गरड, सचिन मांजरे-पाटील, पंचायत समिती
विस्तार अधिकारी नितीन वाघमारे, सुनील
भराडिया, डॉ. सारंग बुरगुटे, राम डोंबे, माजी
सरपंच दशरथ टेकाळे, श्रीधर कांबळे, सूर्यकांत
लोंढे, अरुण बळप, संजय बारबोले.
.jpg)
0 Comments