Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीची नवी खेळी, भाजपला देणार मोठा धक्का!

महाविकास आघाडीची नवी खेळी, भाजपला देणार मोठा धक्का!

 



मुंबई, (कटुसत्य वृत्त):- नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये  राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीने दमदार यश संपादन केले आहे.या विजयानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडून एकत्र पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांच्या १०६ नगरपंचायतींमधील 1802 जागा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत जास्त जागा जिंकल्या आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसनेही धडाकेबाज कामगिरी केली आहे. तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला शह दिला आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आज तिन्ही पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments