Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधीजी जयंती साजरी

 मोहोळ काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधीजी जयंती साजरी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मोहोळ शहर काँग्रेसच्या वतीने मोहोळ येथील शिवाजी चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले तत्पूर्वी अश्वमेघ मोटार ड्राइविंग स्कूल येथे महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब जाधव होते. त्यांनी महात्मा गांधींच्या जीवनचरित्र्या विषयी उपस्थितांना माहिती सांगितली. यावेळी संजय आठवले, किशोर पवार, अमोल मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना हरणमारे, संजय आठवले, दाजी कोकाटे, हरिभाऊ गायकवाड, दिनेश माने, दादासाहेब गायकवाड, अमोल मोरे, हर्षवर्धन पाटील, मेजर खंदारे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन निखिल जाधव यांनी केले तर आभार हरिभाऊ गायकवाड यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments