Hot Posts

6/recent/ticker-posts

गरीबाच्या चेहऱ्यावरील आनंद खरे सुख देतो- अमोल महामुनी

 गरीबाच्या चेहऱ्यावरील आनंद खरे सुख देतो- अमोल महामुनी 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गावापासून कोसो दूर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या बालचमूसह कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी मोहोळ शहराच्या जवळच असलेल्या शेतकऱ्याचा मळ्यात मजुर बाभळीची झाडे तोडून कोळसा तयार करणाऱ्या अधिवासी लोकांसोबत अगदी साधे पणाने आपला वाढदिवस साजरा करून जरवेळे प्रमाणे समाज समोर एक आदर्श निर्माण करण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते व आर पी आय युवक तालुका प्रमुख राहुल तावसकर यांनी केले. मदत करण्यासाठी पैसा लागत नाही.मनाचा मोठेपणा गरीबाची जान आपल्याबरोबर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याची प्रामाणिक इच्छा असावी लागते असे मत नाट्य कलावंत अमोल महामुनी यांनी व्यक्त केले ते राहुल तावसकर यांचे वाढदिवसानिमित्त कोळसा मजूर कामगारांना थंडी पांसून स्वरक्षण होण्यासाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे कार्यक्रमावेळी बोलत होते. राज्यात थंडीची लाट चालू असताना गावातील लोक आपल्या घरामध्ये सर्व सोइ सुविधायुक्त साहित्याचा वापर करून थंडी पासून बचाव करीत असताना माळ रानावर उघड्यावर आपल्या कुटुंबासह  थंडीत कुडकुडत असणाऱ्या आदिवासी मजूर लोकांना आपण काहीतरी मदत करावी या उद्देशाने वाढदिवसाचे औचिक्य साधून सामाजिक कार्यकर्ते राहुल तावसकर यांनी कोणत्याही प्रकारचा हार तुरे न घेता अगदी साधेपणाने अनोळखी आदिवासी लोकांबरोबर आपला वाढदिवस साजरा करून त्यांना जीवन उपयोगी थंडीपासून बचाव करणारे साहित्य भेट दिले. यावेळी नाट्य कलावंत अमोल महामुनी ,गणेश गुरव ,नसीर मोमीन ,राजेंद्र बोराडे ,राजू कुचेकर  अमोल अष्टुळ,पांडुरंग जाधव ,नागेश कसबे सह मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार गणेश गुरव यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments