Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण : कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

 सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण 

- कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  कृषी यांत्रिकीकरण व विविध योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज एक ऐतिहासिक लाभ मिळाला. एकूण १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले असूनकेगाव (उत्तर सोलापूर) येथे आयोजित कार्यक्रमात १०१ नवीन ट्रॅक्टर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले.

या वितरणात अक्कलकोटदक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसलेतालुका कृषी अधिकारीकृषी विभागाचे कर्मचारी तसेच ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते. भरणे यांनी फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्त केल्या.

 

योजना व लाभार्थींची माहिती: 

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी मंजूर निधीच्या आधारे प्रथम अर्जप्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार १,९६,०५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी १,८९,७५३ अर्ज प्रक्रियेत असून ८,२५१ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. तसेच ५५६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ७११.०० लाख रुपयांचे अनुदान थेट वर्ग करण्यात आले आहे.

 

कृषी मंत्र्यांचे आश्वासन: 

या प्रसंगी बोलताना भरणे म्हणालेअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देऊन उत्पादन प्रक्रिया सुलभ करणेमजुरांची टंचाई दूर करणे आणि वेळेची बचत साधणे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमचे यश आहे.


शेतकऱ्यांसाठी नवा अध्याय: 

या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला नवे बळ मिळणार असून उत्पादनक्षमता वाढण्यास हातभार लागणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.                      

Reactions

Post a Comment

0 Comments