Hot Posts

6/recent/ticker-posts

कल्याण नगर येथील अतिवृष्टी बाधित कुटुंबांचे तात्काळ पंचनामे करा

 कल्याण नगर येथील अतिवृष्टी बाधित कुटुंबांचे तात्काळ पंचनामे करा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर भाग एक व दोन येथील सुमारे 25 ते 30 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित असून संसार उपयोगी साहित्यचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कारणाने त्या बाधित कुटुंबाची त्वरित पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे जणता दरबारात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर हा परिसर सखल भागात येत असल्याकारणाने गेल्या दहा वर्षापासून कल्याण नगर मधील सुमारे 25 ते 30 घरांमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान होऊन आर्थिक नुकसान होत आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठा पाऊस पडल्याने कल्याण नगर मधील सुमारे 25 ते 30 नागरिकांच्या घरांमध्ये पावसाची पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले याकडे दक्षिण सोलापूर तहसीलदार प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या बाधित कुटुंबाचे पंचनामे करण्यात आले नाही त्यामुळे शासकीय मदतीपासून या कुटुंबांना वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे या भागातील बाधित कुटुंबीयच्या घराचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी व दरवर्षी भेडसवणारी ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

त्याचबरोबर जुळे सोलापूरला जोडणारा आसरा चौक ते विजापूर रोड हा मार्ग सध्या अत्यंत अरुंद असून रस्त्याच्या कडेला अतिक्रमण ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागांमध्ये फार मोठ्या अनेक नागरी वसाहती निर्माण होऊन लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे हा मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी सुद्धा वारंवार होत आहे त्यामुळे आसरा चौक ते विजापूर रोड हा रस्ता चौपदरी मॉडेल रस्ता म्हणून विकसित करण्यात यावा अशी ही मागणी संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम अरविंद शेळके गजानन शिंदे इस्माईल मकानदार बालाजी वाघे आधी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments