मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्षपदी सुरेश शिवपुजे शहर काँग्रेस अध्यक्षपदी किशोर पवार यांची निवड
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहर काँग्रेस अध्यक्षपदी किशोर पवार यांची निवड नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये मोहोळ काँग्रेस शहराध्यक्ष पद्दी मोहोळ चे युवा नेते किशोर पवार यांची निवड करण्यात आली किशोर पवार यांनी या अगोदर पक्षातील विविध पदावर काम करून सिद्ध केली आहे युवक अध्यक्ष. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वक्ता .काँग्रेस सोलापूर जिल्हा सरचिटणीस. पुणे निरीक्षक ग्रामीण. पंढरपूर मंगळवेढा निरीक्षक मोहोळ. तालुका प्रचार प्रमुख. अशा अनेक पदावर काम केले असून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी यांचे कार्य पाहून कार्य करण्याची संधी दिली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील तरुण चेहरा पुढे केला आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील झाल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्याची वातावरण तयार झाले आहे जिल्हाध्यक्षांचा मोहोळ तालुका गाव भेट दौरा यशस्वी पार पडला त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसमय वातावरण तयार झाले त्या धर्तीवर काम करणारा कार्यकर्ते व संधी देण्याची धोरण जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी राबवले. मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्षपदी सुरेश आप्पा शिवपुजे यांची निवड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये मोहोळ तालुक्याचे अध्यक्षपदी सुरेश आप्पा शिवपुजे यांची निवड करण्यात आली आज पर्यंत सुरेश शिवपुजे हे काँग्रेस पक्षाची एक निष्ठा असून असून त्यांनी वडवळ गावातील सरपंच काँग्रेसचे कार्याध्यक्ष तालुका सरचिटणीस तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष असे अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत त्यांची निवड सर्वत्र स्वागत होत आहे.
0 Comments