Hot Posts

6/recent/ticker-posts

अनेक वर्षापासूनच्या ट्रांसफार्मर मागणीचा प्रश्न सीमाताई पाटील यांनी सोडवला

अनेक वर्षापासूनच्या ट्रांसफार्मर मागणीचा प्रश्न सीमाताई पाटील यांनी सोडवला पाच प्रभागातील नागरिकांनी मानले शिवसेनेचे आभार 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषद हद्दीमधील वार्ड क्रमांक११, १२, १३ १४ १५ मधील शेतकऱ्यांचा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित विद्युत प्रश्न मार्गी लागला असून १०० क्षमतेचे ट्रान्सफार्मर मंजूर झाला आहे अशी माहिती शिवसेना नगरसेविका तथा मोहोळच्या माजी सरपंच सीमाताई पाटील यांनी दिली या महत्वपूर्ण कर्तव्यपूर्तीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे कृतज्ञता नगरसेविका सीमा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. १)शिंपळकर/ गायकवाड १०० चा डीपी २) इंगळे १०० चा डीपी ३) मांडवे/ काळे ॲडिशनल डीपी मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे. इंगळे डीपी व शिंपळकर डीपी बसवण्यात आला असून लवकरच मांडवे/ काळे आणि डीपी बसण्यात येईल. येत्या उन्हाळ्या पूर्वीच सदरचे ट्रांसफार्मर बसवल्यामुळे या प्रभागातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सीमाताई पाटील यावेळी म्हणाल्या. या कामाचा शुभारंभ शिवसेनेचे युवा नेते शिवरत्न गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. हे काम एसीएफ फंडातून करण्यात आले असून या साठी तत्कालीन उपकार्यकारी अभियंता हेमंत ताकपिरे,सहाय्यक अभियंता अंबरे, महावितरणचे ठेकेदार महेश दळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची कृतज्ञता या वेळी सीमाताई पाटील यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षापासून असा प्रश्न अथक परिश्रम आणि अभ्यासू पाठपुराव्याने सोडवल्याबद्दल शेतकऱ्यांनी यावेळी शिवसेना नेते दिपक गायकवाड व सीमा पाटील यांचे आभार मानत वेळोवेळी पाठपुरावा करणारे शिवरत्न गायकवाड यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी रामभाऊ काळे ,धनाजी काळे, शिवाजी फडतरे, अरुण बरकडे, किरण फडतरे, केदार काळे, गोरख गोडसे, अरिफ शेख, अजित काळे, पंडित इंगळे, चंद्रकांत माने, दत्तात्रय गायकवाड नाना कटके अरुण बरकडे उपस्थित होते

 

Reactions

Post a Comment

0 Comments