मावळ्यांनो सावधान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-काल ब मो पुरंदरे यांचे निधन झाले आहे . असे समजते की पुरंदरे यांच्या अस्थी स्वराज्यातील एकूण अकरा गडावर विसर्जित करण्यात येणार आहेत . कृपया ही अफवा आहे की सत्य तपासून घ्यावे ...
जर ते खरे असेल तर मराठा सेवा संघ यास पूर्ण ताकदीनिशी विरोध करेल असे जाहीर करण्यात येत आहे . हा शिवरायांचा तसेच स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या अनेक सेनापती सरदार इनामदार मावळे यांचा उपमर्द होय . अपमान आहे . कारण महाराजांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढलेल्या अनेक सहकाऱ्यांच्या बाबतीतही असे घडलेले नाही ...
शिवप्रेमींनो , आपणास विनंती व आवाहन आहे की कृपया सावध राहा . शिवरायांच्या सर्व गडकोट , किल्ले , जलदुर्ग इत्यादी ठिकाणी कडक पहारा द्यावा . नजर ठेवून काळजी घ्यावी . जर कोणीही न जुमानता जबरदस्तीने तसेच काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यास प्रसंगी कडेलोट करावा . महत्वाचे म्हणजे कदाचित यासाठी आपल्या परिसरातील व परिचयातील , नात्यातील मुले-मुली वापरले जाऊ शकतात . त्यांना दूर रहायला सांगावे ही विनंती ..
तसेच त्वरित आपापल्या परिसरातील स्थानिक पालक मंत्री , आमदार खासदार ,जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधीक्षक , प्रांत , तहसीलदार , पोलीस स्टेशन , गावचे सरपंच व सरकारी अधिकारी , जिल्हा परिषद सदस्य , स्थानिक समाज कार्यकर्ते व इतर पदाधिकारी , शिवप्रेमी मंडळी यांच्या कानावर घालून सगळीकडेच लेखी पत्राने निवेदन देणे .. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ...पुरुषोत्तम खेडेकर चिखली
0 Comments