Hot Posts

6/recent/ticker-posts

वेताळवाडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बापु सुरवसे यांची बिनविरोध निवड

 वेताळवाडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बापु सुरवसे यांची बिनविरोध निवड




माढा (कटूसत्य वृत्त):वेताळवाडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बापु नारायण सुरवसे यांची बिनविरोध  निवड  करण्यात आली. गावच्या सरपंच रजनी सुरवसे,उपसरपंच अॅड पाडुरंग खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी ग्रामसभा  पार पडली.ग्रामसभेत एकमताने बापु सुरवसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. वेताळवाडी गावचे २५ वर्षापासुन  तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद कै.साहेबराव सुरवसे यांनी  यशस्वीरीत्या सांभाळुन गावात शांतता व सुव्यवस्थता अबाधित ठेवली होती.त्यांचेच नातु असलेल्या बापु सुरवसे यांच्याकडेच आता गावच्या तंटामुक्त समितीच्या  अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.निवडीनंतर बापु सुरवसे यांचा सरपंच उपसरपंच यांचेसह ग्रामस्थांनी सन्मान केला.यावेळी  सरपंच रजनी मगन सुरवसे,उपसरपंच अॅड पाडुरंग खोत,पोलिस पाटील मनिषा सुरवसे,प्रा.रवि सुरवसे,ग्रामसेविका  मनिषा शेंडेकर,शहाजी सुरवसे,राजेश खोत,ग्रामपंचायत सदस्य  अश्विनी जाधव,आशा सुरवसे,सतीश खोत,विनायक खोत,रामेश्वर लोंढे,धनाजी सुरवसे,सुधिर सुरवसे,दयानंद जाधव,रामदास सुरवसे,शरद सुरवसे,रघु सुरवसे  आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments