प्रियदर्शनी महिला विकास मंडळाच्या वतीने गरोदर महिलांकरिता केसर वाटपाचा उपक्रम
माढा (कटूसत्य वृत्त):- प्रियदर्शनी महिला विकास मंडळाच्या वतीने माढा शहरातील गरोदर महिलांकरिता केसर वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.शहरातील १२५ महिलांना केसर ची डबी, ड्रायफ्रुट,ओटीचे सामान मोफत स्वरूपात वाटप करण्यात आले.मित्रप्रेम रुग्णालयाचे डाॅ.विकास मस्के यांनी महिलांना गरोदरपणामध्ये घ्यावयाची काळजी आणि त्यांनतर ही बाळाची कश्या प्रकारे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.माजी नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्या हस्ते केसर चे वाटप झाले.अॅड.साठे यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले.तसेच बालदिनानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी माढा शहरातील एकूण 125 गरोदर महिलांना केसर वाटप करण्यात आले असुन ज्या महिला येऊ शकल्या नाहीत अश्या महिलांच्या घरी जाऊन केसर वाटप करणार असल्याचे अॅड. मिनल साठे यांनी सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे,अनिता सातपुते,कल्पना जगदाळे,गीतांजली देशमुख,अपर्णा मेहता,मालती शहा,विदुला कुंभेजकर,अनिता टिंगरे,विजया कोल्हे,सरोजिनी कोल्हापुरे,प्रियंका गवळी,पल्लवी साबळे,वैशाली कथले,दिपाली गुंड,सुनीता राऊत,दिपाली इंगळे यांचेसह अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि आशासेविका उपस्थित होत्या.
0 Comments