Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय चर्मकार महासंघ,शिक्षक महासंघाच्या वतीने मेळावा गुणवंतांचा होणार सन्मान

 राष्ट्रीय चर्मकार महासंघ,शिक्षक महासंघाच्या वतीने मेळावा गुणवंतांचा होणार सन्मान


 

 जिल्हाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांची माहिती,कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन


कुर्डुवाडी (कटुसत्य वृत्त):- राष्ट्रीय चर्मकार महासंघ, राष्ट्रीय चर्मकार शिक्षक महासंघाच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी समाज कल्याण मंत्री, शिवसेना उपनेते बबनराव  घोलप यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रणितीताई शिंदे व बिपिनभाई पटेल अध्यक्ष अश्विनी रुग्णालय सोलापूर, नगरसेवक डॉ. किरण देशमुख सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रविवार दिनांक 21.11.2021 रोजी सकाळी 11 वाजता किर्लोस्कर सभाग्रह हिराचंद नेमचंद वाचनालय, चार हुतात्मा पुतळा शेजारी सोलापूर येथे संपन्न होत आहे.                   या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्ह्यातील चर्मकार समाजातील अधिकारी, पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर,विविध महामंडळ व बँक कर्जाविषयी माहिती व सन्मान सोहळा आयोजित केलेला असून सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मार्गदर्शक व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष समाजभूषण संजय बाबा शिंदे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मार्गदर्शक अशोक लांबतुरे व राष्ट्रीय चर्मकार शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब आडसुळ यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी समाजाचे भूषण राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच सोलापूर जिल्हा शहर सर्व पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सर्व संस्थाचालक, शिक्षक,अधिकारी, पदाधिकारी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments