तहसीलदारांची कामगिरी मस्त,प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर मात्र अजूनही सुस्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर अजूनही वाळूमाफियाच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरले असल्याची चर्चा अनेक वाळू चोरी विरोधी लढा उभा करणाऱ्या जनमाणसातून चर्चिली जात आहे, त्यामानाने सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांचे तहसिलदार मात्र अहोरात्र जागरण,पथके नेमूनआणि गस्त घालून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे, नागरिकांतून तहसीलदारांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.मात्र प्रांताधिकारी समिंदर मात्र अजूनही सुस्तावलेले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
आपल्या विभागातील कनिष्ठ विभागप्रमुखाना आदेश देवून साहेब मात्र "साहेबी थाट"दाखवत असल्याची तिखट प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी बोलून दाखवली आहे.गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला हेलपाटे मारूनही मिळत नाही."ज्यांचा साहेबांजवळ वशिला ,त्याचेच काम प्रगतीपथावरून मार्गी लावले जात असल्याची खंत अनेक शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील रस्ता,विहीर, बोर घेणे या कारणांसाठी दहा गुंठे आतील जमीन खरेदी विक्रीसाठी सादर केलेल्या अनेक प्रस्तावातील फायली साहेबांनी "बंद पाकिट न मिळाल्याने"निकाली काढल्या असल्याची चर्चा तक्रारदारांमधून बोलली जात आहे.या पूर्वी च्या प्रांताधिकारी यांनी मात्र शेतकऱ्यांच्या अशा प्रस्तावावर वस्तुनिष्ठ आणि गरज ओळखून शेतकऱ्यांना सनद दिल्या होत्या. या सर्व कारणांमुळे अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या विरोधातील तक्रारीचा पाढा लवकरच वाचून दाखवणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
0 Comments