सुट्टीच्या दिवशीही होणार दस्त नोंदणी कामकाज मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांची माहिती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 19, 2021

सुट्टीच्या दिवशीही होणार दस्त नोंदणी कामकाज मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांची माहिती

 सुट्टीच्या दिवशीही होणार दस्त नोंदणी कामकाज मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांची माहिती

 

सोलापूर  ( कटुसत्य वृत्त ) :-  राज्य शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्काची सवलत दिल्याने नोंदणीसाठी पक्षकारांची दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठीपक्षकारांची गैरसोय होऊ नयेदस्तऐवज नोंदणीची सुविधा मिळावीयासाठी जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधकदुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी दिली.


               मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावायासाठी नोंदणी कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. पुढीलप्रमाणे कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहतील. सह दुय्यम निबंधक वर्ग 2 सोलापूर उत्तर क्र.1उत्तर क्र.2उत्तर क्र.3 आणि सह दुय्यम निबंधक वर्ग 2 दक्षिण सोलापूर (27 आणि 28 मार्च 2021)सह दुय्यम निबंधक वर्ग 2 बार्शी (20 आणि 27 मार्च 2021)सह दुय्यम निबंधक वर्ग 2 पंढरपूर क्र.1 (20 आणि 27 मार्च 2021)दुय्यम निबंधक श्रेणी 1 सांगोलामंगळवेढा, अक्कलकोटमोहोळपंढरपूर क्र.2करमाळा (20 आणि 27 मार्च 2021) आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 माढा येथील कार्यालय 20 आणि 21 मार्च27 आणि 28 मार्च 2021 रोजी सुरू राहणार आहे.


            जास्तीत जास्त नागरिकांनी मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन गिते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages