टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतून साडेआठ लाख रुपयाचे लोखंडी साहित्य चोरी अज्ञात चोरट्यांवरती गुन्हा दाखल
टेंभुर्णी ( कटुसत्य वृत्त ) :- टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत कन्स्ट्रक्शन काम करण्यासाठी ठेवलेले कान्स्ट्रवेल कंपनीचे साडेआठ लाख रुपयांचे लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून सततच्या चोरीच्या घटनेने कन्स्ट्रक्शन कंपन्या अडचणीत आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की , पुणे येथील उत्कर्ष कन्स्ट्रवेल कंपनी कडून टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत मे.इको क्रीट सिंडर बिल्डकन प्रा.ली.या कंपनीचे बांधकाम करण्यात येत आहे.यासाठी कन्स्ट्रवेल कंपनीने लागणारे अनेक लोखंडी साहित्य याठिकाणी आणून स्टोअर कटुन ठेवले होते.हे काम अमर कृष्णराव देशमुख (वय-३८) रा.डी-१५-प्लॅटिन पार्क मानाजी नगर पुणे या मॅनेजरच्या देखरेखीखाली सुरू होते.या सामानाच्या देखरेखीसाठी रात्रपाळीवर गणेश उत्तम कदम यास नेमले होते.दि.९ मार्च रोजी कदम हा त्यादिवशी रात्रपळीसाठी ७ वा. कामावर आला होता.मात्र तो रात्री ९ वा.जेवण करण्यासाठी परत घरी गेला.ड्युटीसाठी नंतर गरलाच नाही.१० रोजी रात्री नेहमीप्रमाणे ७.३० वा. गेला असता त्यास खुल्या प्लॉट मध्ये ठेवलेल्या ठिकाणी लोखंडी साहित्य दिसून आले नाही.याविषयी कदम याने ८.३० वा. सुमारास फोनवरून देशमुख यांना माहिती दिली होती.दि.११.०३ रोजी मॅनेजर अमर देशमुख पुणे यानी समक्ष येऊन पाहून खात्री केली होती.
याविषयी मॅनेजर अमर देशमुख यांनी दि.१६ मार्च रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यामध्ये ४ लाख १० हजार ४१० रुपये किमतीचे ११ पीईपी फॅब्रिकेटेड लोखंडी कलम व ४ लाख ३६ हजार ६५० रुपये किमतीचे पीईपी फॅब्रिकेटेड लोखंडी राफ्ट असे ऐकू। ८ लाख ४७ हजार ०६० रुपये किमतीचे लोखंडी साहित्य ९ मार्च रोजी रात्री १२वा.ते दि.१० मार्च रोजी रात्री २१० वा.दरम्यान टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमधील इको क्रीट सिंडरबिल्डकन प्रा.ली.या कंपनीच्या आवारातून इंडस्ट्रीज बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य स्टोअर करून ठेवलेले अज्ञात चोरट्यानी चोरून नेले आहे.टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतून असे मोठ्या किमतीचे साहित्य चोरी होण्याचे प्रमाण अधिक असूनही व आतापर्यंत झालेल्या चोरीच्या घटनेचा योग्य तपास न झाल्याने चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे.
0 Comments