आ. यशवंत माने यांच्या विकास निधीतून विविध कामांचे भूमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 19, 2021

आ. यशवंत माने यांच्या विकास निधीतून विविध कामांचे भूमिपूजन

आ. माने, बाळराजे पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

मतदार संघासाठी निधी कमी पडू देणार नाही आ.माने यांची ग्वाही

मोहोळ ( कटूसत्य वृत्त) :-  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच सातत्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विकासाचे पालकत्व खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे. त्यामुळेच माजी आ. राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यात विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मतदार संघातील बंधू-भगिनी दिलेल्या आमदारकीच्या महत्त्वपूर्ण संधीचे सोने जास्तीत जास्त विकास कामे खेचून आणत करू शकलो याचे मनाला कृतार्थ समाधान वाटत आहे. यापुढील काळातही जेष्ठ नेते राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासनाच्या विविध विभागाकडून पाठपुरावा करून मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणु असा विश्वास मोहोळ विधानसभा मतदार संघाचे दक्ष आ. यशवंत माने यांनी व्यक्त केला.

                  मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आ. यशवंत माने यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि पंचवीस पंधरा योजनेतून मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध विकास कामांचे उदघाटन आणि रस्त्यांचे भुमिपुजन कार्यक्रम आमदार यशवंत माने यांच्या शुभ हस्ते  आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे युवानेते बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. यशवंत माने बोलत होते.

            यावेळी केलेल्या विविध उदघाटनामध्ये आ. यशवंत माने यांच्या स्थानिक विकास निधीतून  शेटफळ येथे मंजूर ३ हायमास्ट दिव्याचे उदघाटन झाले यावेळी दत्ता पवार ॲडव्होकेट राजा गुंड यांच्यासह आष्टी गिड्डेवाडी शेटफळ येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.त्याचबरोबर मोहोळ तालुक्याचे दक्षिण विभागातही विविध विकास कामांचे उदघाटन पार पडले. मोहोळ तालुक्यातील वडदेगांव ते नळी रस्त्याचे २५/१५ योजनेअंतर्गत १५ लाख मंजूर निधीतून रस्ताच्या कामाचे भूमीपूजन आ. यशवंत माने लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी सरपंच माणिक सुरवसे यांच्यासह वडदेगाव येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील कामती खु. येथे आ. यशवंत माने साहेब यांच्या विकास निधीतून व प्रयत्नातुन पाच मंजुर हायमास्ट दिव्याचे उदघाटन व विविध विकास कामाचे भुमिपूजन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आ. यशवंत माने, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे स्वागत आणि सत्कार यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक  दीपक माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोहोळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, सरपंच सविता किरण माळी, उपसरपंच  दीपक काटकर, सदस्या शुभांगी माने यांच्यासह जेष्ठ नागरिक अन्य ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages