नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे केले जतन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे केले जतन

 नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे केले जतन

सामाजिक कार्यकर्ते राहुल तावसकर यांच्या प्रयत्नाला यश 


मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ -गेल्या वर्षभरापासून मोहोळ शहरातील ऐतिहासिक वास्तूचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्नशील असलेले सामाजिक कार्यकर्ते राहुल तावसकर यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी असून कौतुक करण्यासारखे आहे.आवड असलीकी सवड मिळते या प्रमाणे आपला कामधंदा प्रपंच करून सुद्धा सामाजिक कार्य करता येऊ शकते फक्त जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीच  गोष्ट अवघड नसते हे राहुल तावसकर यांनी आपल्या कार्यातून दाखून दिले आहे असे मत युवकांचे मागर्दर्शक अमोल महामुनी यांनी व्यक्त केले पुनुरुजीवित नवीन वास्तूचे पूजन केल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी  अमोल महामुनी, राहुल तावस्कर, नासिर मोमीन, उमेश गोटे, विकास गोटे, सह मान्यवर  उपस्थित होते.
                  देश स्वतंत्र होण्याचे अगोदर सन १९०५ साली रामलाल लच्छीराम परदेशी यांनी मोहोळ शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेली ऐतिहासिक वास्तू  असलेली गाव वेस जी मोहोळ शहराच्या इतिहासाची साक्ष देणारी जुनी वास्तू आहे.हि ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात समाजाच्या दुर्लक्षित पणामुळे पूर्णपणे पडझड होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर होती.सामाजिक कार्यकर्ते राहुल तावसकर यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या सोबतीने वेसीचे पुनर्जीवन करण्याचे काम करून तरुण पिढीला आपल्या गावाचा इतिहास समजण्यासाठी सुंदर अशी कित्येक वर्षांपासून उभी असलेली गाव वेस आजही लोकांना  इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूचे जतन करून समाजासमोर एक आदर्श असे प्रेरणादायी कार्य केले आहे.
               या ऐतिहासिक वास्तूचे बांधकाम रंगरंगोटी काम पूर्ण झालेले असून अतिशय शोभनीय अशी वास्तू नागरिकांना पाहण्यासाठी सज्ज झालेली आहे.या सुशोभित वास्तूचे पूजन युवकांचे मार्गदर्शक अमोल महामुनी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी अमोल महामुनी, राहुल तावस्कर, नासिर मोमीन, उमेश गोटे, विकास गोटे, धनंजय गोटे, बुवा चौधरी,आतिष गायकवाड, मोहोन पिलीवकर,भारत गोटे, प्रवीण दीक्षित, किरण गोटे,गणेश बोराडे,संजय स्वामी, ओम गोटे, जामुन कोळेकर, कार्तिक तावस्कर,ऋषी गोटे, भाजनदास कोळी, अमोल आष्टुल,बापू आष्टुल,दत्तात्रय गोटे अभिजीत पिलीवकर ,किशोर जाधव, नंदकुमार मोहोळकर,आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार गणेश बोराडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages