धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रयत्नामुळे वीज ग्राहकांना दिलासा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रयत्नामुळे वीज ग्राहकांना दिलासा

 धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रयत्नामुळे वीज ग्राहकांना दिलासा

अकलूज (कटुसत्य वृत्त ) :-  महावितरण वीज कंपनीने विना नोटीस देता अनेक नागरिकांची जबरदस्ती वीज तोडणी करण्यात आली आहे येत आहे  . 
         कोरोना महामारीच्या टाळेबंदी दरम्यानचे वीज बिल  माफ होईल म्हणून सरकारने नागरिकांना वर्षंभर झुलवत ठेवले व नंतर वीज बील माफी वरून सरकारने यु टर्न घेत जबरदस्तीने वीज बील आकारण्याचे धोरण ठरवले. हा निर्णय म्हणजे कोरोना महामारीमुळे प्रचंड आर्थिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या सोबत केलेला हा प्रचंड मोठा विश्वासघात होता. आता ही अधिवेशना दरम्यान वीज तोडणी संदर्भात विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर वीज तोडणी केली जाणार नाही म्हणून अर्थमंत्र्यांनी घोषणा केली व अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ वीज तोडणी चालू करा म्हणून महावितरणला निर्देश दिले.
          महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे महावितरणच्या जबरदस्ती वीज तोडणीमुळे नागरिकांना  प्रचंड प्रमाणात मनस्ताप भोगावा लागत आहे. अशाच महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे त्रासलेले नागरीक धैर्यशील  मोहीते पाटील यांच्या कडे आपली कैफियत घेऊन आले. 
           नागरीक टप्प्या टप्प्याने वीज बील भरण्याबाबत सुट मागत असताना नागरिकांचे म्हणणे ऐकुन न घेता शंभर टक्के वीज बील न भरल्यास कोणतीही नोटीस न देता वीज तोडणी मोहीम महावितरण कंपनी चालवत आहे. ही मोहीम तात्काळ थांबवत नागरिकांच्या बाजूने "फैसला" करून घेतला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages