प्रभात 15 मधून आता युवा उद्योजक तन्वीर शेख यांच्याही नावाची चर्चा
गेल्या अनेक वर्षांपासूनचा जनसंपर्क येणार कामाला , राजकीय मार्गदर्शकांनी संधी दिल्यास नगर परिषद निवडणूक लढवणार.. तन्वीर शेख
मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून जरी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असली तरी गेल्या काही दिवसापासून एक नाव झपाट्याने पुढे येत आहे ते म्हणजे मोहोळ शहरातील प्रत्येक यशस्वी उद्योजक तन्वीर शेख यांचे. तन्वीर शेख हे ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रथम नगराध्यक्ष, शहरातील खंबीर नेतृत्व रमेश बारसकर यांचे निकटवर्तीय समर्थक मानले जातात. गेल्या काही वर्षापासून शेख राजकारणात सक्रिय आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठी ते प्रभाग 7 मधून यापूर्वी इच्छुक होते. मात्र प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये आरक्षण एस. सी. महीला झाल्यामुळे तन्वीर शेख यांची मोठी राजकीय कोंडी झाली. त्यामुळे इतर संपर्कातील प्रभागात तन्वीर शेख यांनी निवडणूक लढवावी असा त्यांच्या समर्थकांचा पवित्रा आहे .त्यामुळे तन्वीर यांनी आता शहराच्या दक्षिण भागातील प्रभाग 15 मधून निवडणूक लढवावी अशी इच्छा या प्रभागातील अनेक नागरिकांनी तन्वीर शेख आणि त्यांचे राजकीय मार्गदर्शक मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्याकडे व्यक्त केली.त्यानंतर तन्वीर शेख यांनाही भेटून आपण या प्रभागात निवडणूक लढवावी अशी विनंती केली. त्यामुळे लवकरच तन्वीर शेख हे या प्रभागात एक विचारविनिमय आणि सल्लासंवाद बैठक आयोजित करून पुढील निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याचे समजते.तनवीर शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नाव आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका, कोणाचीही काहीही कार्यालयीन अडचण असली की सर्वांच्या मदतीला धावून जाणारा हा सर्वसामान्यांचा मसीहा निवडणुकीच्या रणांगणात उतरावा अशीच प्रत्येक शहरवासीयांची इच्छा आहे. त्यामुळे तन्वीर शेख यांनी निवडणूक लढवावी अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.
तन्वीर शेख हे जरी शहराच्या पूर्व भागात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असले तरी बांधकाम उद्योग क्षेत्राच्या निमित्ताने ते शहराच्या दक्षिण भागासह संपुर्ण मोहोळ शहरात नावारूपाला आलेले लोकाभिमुख व्यक्तिमत्व आहेत. बांधकाम क्षेत्रामुळे प्रत्येक लघु उद्योजकांच्या ते सातत्याने संपर्कात असतात .अनेकांच्या घराचे स्वप्न किफायतशीर दरात पूर्ण करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शहरातील अनेक सुशिक्षित आणि इतर क्षेत्रातील समाजघटकांचा त्यांच्याशी मोठा जनसंपर्क सुरुवातीपासूनच आहे. हद्दवाढ भागात तन्वीर शेख यांचा असलेला अफाट जनसंपर्क त्याचबरोबर सर्वपक्षीय सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेली विकास कामाबद्दलची तळमळ या दोन बाजू तन्वीर शेख यांच्या जमेच्या बाजू ठरणार आहेत.त्यामुळे तन्वीर शेख यांच्या प्रभाग 15 मधील उमेदवारीचा निर्णय जरी अंतिम नसला तरी शेख हे यावेळी इतर कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवणार हे मात्र नक्की.

No comments:
Post a Comment