प्रभाग क्रमांक 16 मध्ये लेंगरे परिवाराला भाजप उमेदवारीचे स्पष्ट संकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

प्रभाग क्रमांक 16 मध्ये लेंगरे परिवाराला भाजप उमेदवारीचे स्पष्ट संकेत

 प्रभाग क्रमांक 16 मध्ये लेंगरे परिवाराला भाजप उमेदवारीचे स्पष्ट संकेत

सारिका लेंगरे यांचा जनसंपर्क सुरू , विद्यमान नगरसेवक सुशील क्षीरसागर ठरणार किंगमेकर

                                        

मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- गेल्या पाच वर्षापासून विकासकामांमध्ये अग्रेसर ठरलेल्या प्रभाग क्रमांक 16 चे प्रतिनिधीत्व सध्या भाजपचे शहराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुशील क्षीरसागर हे करत आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांना पराभूत करत सुशील क्षीरसागर यांनी अल्पमतांनी हा प्रभाग रोमहर्षकरित्या ताब्यात घेतला. राजकारण हे प्रपंचाचे साधन न मानता ठेकेदारी स्वतः न करता केवळ प्रभागाचा सर्वांगिन हित साधण्यासाठी सुशील क्षीरसागर यांनी मोहोळ नगरपरिषद स्तरावर आणि नगरविकास विकास खात्याकडे पाठपुरावा करत तब्बल साडेपाच ते सहा कोटीची विकास कामे प्रभागात पूर्ण केली. आ. सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून तब्बल एक कोटीचा विशेष निधी या प्रभागासाठी खेचून आणला.
            आता हा प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सुशील क्षीरसागर यांना या प्रभागातून निवडणूक लढवणे अशक्य बनले. त्यामुळे आता या पुढील काळात या प्रभागाचे प्रतिनिधित्व कोण करणार ?याबाबतची राजकीय चर्चा सुरू झाली. सुशील क्षीरसागर यांना सदैव बंधूसमान प्रेम देणारे आणि गेल्या अनेक वर्षापासून भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्षपदी काम करणारे युवा उद्योजक सागर लेंगरे यांच्या परिवाराला संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली. लेंगरे परिवारातील सारिका सागर लेंगरे यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे.
          सुशील क्षीरसागर यांचे आणि लेंगरे परिवाराचे गेल्या अनेक वर्षापासूनचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध आहेत. शिवाय लेंगरे परिवार हा गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे विद्यमान आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला परिवार आहे. सुभाष देशमुख असोत अथवा इतर कोणतेही भाजपचे बडे नेते असोत मुंबईहून सोलापूरकडे चालले अथवा सोलापूरहून राज्यात कुठेही चालले तरी सागर लेंगरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सागर लेंगरे यांच्याशी आपुलकीचा संवाद साधूनच पुढे निघतात. ही बाब संपूर्ण शहरवासीयांनी अनुभवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून भाजपाचा सक्रिय आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख अल्पावधीतच निर्माण करत सोलापूर पासून मुंबई पर्यंत अफाट जनसंपर्क संकलित केलेल्या सागर लेंगरे यांना पक्ष निष्ठेचे फळ नक्की मिळणार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण शहरात आहे.
            प्रभागातील कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे शहरातील पदाधिकारी यांच्या समन्वयातून सागर लेंगरे यांच्या सुविद्य पत्नी सारिका सागर लेंगरे यांच्या नावाला सध्या पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. सारिका लेंगरे या उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार असल्यामुळे या निवडणुकीत त्या निश्चितपणे एक इलेक्टिव्ह मेरीटच्या उमेदवार ठरू शकतात. शिवाय लेंगरे यांचा या प्रभागात मोठा स्नेह परिवार असल्यामुळे त्यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळू शकते ही बाब हेरूनच पक्षश्रेष्ठी आ. सुभाष देशमुख आणि संजय क्षीरसागर यांनी सागर लेंगरे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. विद्यमान नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी केलेली साडेपाच कोटींची विकासकामे आणि यापुढील काळात प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे दिलेले ठोस आश्वासन या बाबी जमेच्या ठरणार असल्याने भाजपने संधी दिल्यास नक्कीच सारिका लेंगरे या प्रभागातून नक्कीच विजयश्री खेचून आणू शकतात.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages