नृत्यकलेचा ध्यास व्यक्तीमत्वाला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवतो- रोहित चौधरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

नृत्यकलेचा ध्यास व्यक्तीमत्वाला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवतो- रोहित चौधरी

 नृत्यकलेचा ध्यास व्यक्तीमत्वाला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवतो- रोहित चौधरी

करमाळा (कटूसत्य वृत्त):- नृत्यकला आपल्याला अनेक गोष्टी शिकवते किंबहुना आयुष्य कसे जगायचे हे शिकवते,आपले व्यक्तिमत्व  घडवते,अभिनयसंपन्न, सुशिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत बनवते. भारतीय नृत्यकलेची हीच तर खासियत आहे, असे प्रतिपादन युथ आयकाॅन सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांनी केले.

     करमाळा येथील ब्ल्यू स्टार डान्स अकॅडमीने कोरोना चे नियम पाळून आॅनलाईन नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दोन गटात घेतलेल्या या ऑनलाईन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे पार पडला.यावेळेस बोलताना यशकल्याणीचे गणेश करे-पाटील म्हणाले की,नृत्य करणे म्हणजे केवळ हात पाय हलविणे नव्हे, तर त्यामागे सखोल अभ्यास असावा लागतो. नृत्यासोबत मुख्य आहे तो अभिनय. मंचावर नदी, झाड, आकाश, समुद्र नसताना तो आहे असा भास निर्माण करून द्यायला, उच्च कोटीच्या अभिनयाची गरज असते.यावेळेस डॉ.सौ.वर्षा करंजकर,डॉ.सौ. कविता कांबळे यांनी सर्व स्पर्धकांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

               शिक्षक नेते व कुशल उद्योजक सुनील कदम ,कल्पवृक्ष महिला पतसंस्थेचे चेअरमन अक्षय मंडलेचा, सचिव सविता जाधव,सामाजिक कार्यकर्ते सचिन अब्दुले आदी उपस्थिती होते.
लहान गटात समर्थ कुलकर्णी व यश कोरे (प्रथम),संघमित्रा कांबळे व हिंदवी जानभरे(द्वितीय),स्वरा सूर्यवंशी(तृतीय) ,स्वराज कांबळे (उत्तेजनार्थ) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
मोठ्या गटात अमित शेख (प्रथम), रोहित मेहता व केदार वाघमारे(द्वितीय), दिव्या जाधव (तृतीय),समीर मेश्राम(उत्तेजनार्थ) यांनी बाजी मारली. सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages