करमाळा शहरात डांबरीकरणाचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

करमाळा शहरात डांबरीकरणाचा शुभारंभ

 करमाळा शहरात डांबरीकरणाचा शुभारंभ

करमाळा   (कटुसत्य वृत्त ) :-  करमाळा नगरपालिकेने  किल्ला वेस ते महाराणा प्रताप पुतळा या रस्त्याच्या डांबरीकरण कामास आज करमाळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांच्या शुभहस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक संजय सावंत, महादेव फंड, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी माजी नगरसेवक दिपक सुपेकर, माजी नगरसेवक किरण बोकन, जमील काझी आदी  उपस्थित होते. 
             यावेळी नगरसेवक संजय सावंत म्हणाले की किल्ला वेस- वेताळ पेठ -महाराणा प्रताप पुतळा -तसेच रावळ गल्ली ते स्वामी विवेकानंद चौक हा रस्ता या योजनेतून  23 लाख रुपये खर्च करून तयार होणार आहे. तसेच या भागातील सर्व गटारी चे काम पुर्ण झाले असुन पाण्याची पाईपलाईन चे काम पुर्ण झालेआहे. वीजेच्या पोलवर एल ई डी दिवे बसवण्यात आले असुन या प्रभागात अंदाजे अडीच कोटी रूपये आता पर्यंत  खर्च नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचे त्यांनी   यावेळी सांगितले.
                यावेळी रस्ता डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी प्रभाग क्रमांक दोन मधील सुरेश पवार, चंद्रकात पवार, प्रकाश यादव, पांडुरंग वाघमारे, राजेंद्र वाघमारे, जयकुमार क्षीरसागर, बापु जाघव, विनोद इंदलकर ,गोपीनाथ वाघमारे ,संभाजी गायकवाड, पप्पु रंधवे ,शाम सुळ , दिनेश राठोड, बाळासाहेब बोकन आदी  उपस्थित होते. यावेळी ठेकेदार शैलेश खडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages