Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग 17 मधून माजी आ. राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक मेजर तानाजी माने यांनी केली उमेदवारीची मागणी

 प्रभाग 17 मधून माजी आ. राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक मेजर तानाजी माने यांनी केली उमेदवारीची मागणी

प्रभागातील शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली  अनगर येथे जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट


मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेल्या प्रभाग क्रमांक सतरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून या प्रभागातील कुशल संघटक मेजर तानाजी माने यांना उमेदवारी देण्याची मागणी प्रभागातील बहुतांश नागरिकांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आ. राजन पाटील, दक्ष आ. यशवंत माने, राष्ट्रवादीचे युवा नेते बाळराजे पाटील,युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांना प्रत्यक्ष भेटून प्रभागातील शेकडो नागरिकांनी यावेळी राष्ट्रवादीकडून मेजर माने यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी केली.
आजवरच्या अनेक निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट असूनही माने परिवाराने सतत सामंजस्याची भूमिका घेत प्रभागातून इतरांना विजयाची संधी देण्याचं मनाचा मोठेपणा दाखवला आहे.  त्यामुळेच अनगर येथे जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट प्रभाग सतरा मधील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली. युवा नेते बाळराजे पाटील यांनाही भेटून प्रभागातील सर्वांनी राष्ट्रवादीच्या प्रभागातील सद्यस्थिती बद्दल वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे सध्या उमेदवारीबाबत मेजर तानाजी माने यांचे पारडे जड जाणवत आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून केवळ आणि केवळ राष्ट्रवादी सोबतच असलेले निष्ठावंत मेजर तानाजी माने यांच्या संघटन कौशल्याची दखल घेऊन माने यांच्याच उमेदवारीचा विचार करावा अशी मागणी प्रभागातील राष्ट्रवादी समर्थकांमधुन होत आहे.यावेळी माने परिवारातील  किरण माने, सुनील कोकणे, भारत कोकणे, अंकुश माने,  श्रीकांत ढवण , नितीन माने, सिद्धू सलगर ,चंद्रकांत माने, आप्पा खरात किसन खरात वसंत बरकडे राजू माने अशोक माळी संतोष माने विनोद माने उद्धव खरात बिरूदेव माने शरद माने विठ्ठल माने महादेव वाघमोडे नागेश खरात श्रीरंग माने शहाजी माने दिनेश माने नागेश सोनटक्के सिताराम लेंगरे संजय माने विलास माने पंढरी माने बाळू माने बिरुदेव माने इत्यादी सर्व प्रभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष प्रभागाचा सर्वांगीण विकास करू शकतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सुरुवातीपासूनच मनामध्ये ठेवून माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात सक्रिय राहण्याचे पक्षकार्य मेजर माने यांनी सुरूवातीपासून केले आहे. सन 2017 साली माने परिवाराने सुरु केलेल्या दूध डेअरीजच्या शुभारंभासाठी प्रभागात सर्वप्रथम राजन पाटील यांचे आगमन प्रभागात झाले होते. त्यामुळे प्रभागात राजन पाटील केवळ यांच्याशी निष्ठावंत असलेला माने परिवार आजही राष्ट्रवादी सोबतच आहे ही बाब अजूनही प्रभागातील राष्ट्रवादी समर्थक विसरले नाहीत. त्यामुळे प्रभाग आता सर्वसाधारण खुला झाल्याने यावेळी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व वस्त्यांचे आणि माने परिवाराचे अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेच्या भावनेने प्रतिनिधित्व करणाऱ्या मेजर तानाजी माने यांनाच संधी द्यावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments