Hot Posts

6/recent/ticker-posts

महावितरणच्या प्रतीक्षायादीचा विचार न करता मदतीला धावून आला युवा नेता

 महावितरणच्या प्रतीक्षायादीचा विचार न करता मदतीला धावून आला युवा नेता

राष्ट्रवादीचे युवा नेते सुदर्शन गायकवाड यांनी शिंपळकर वस्ती ट्रांसफार्मरचा प्रश्न काही क्षणात सोडविला

मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सातत्याने चर्चेत असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा होय. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या प्रभागात रस्ते पाणी आरोग्य आणि विजेची समस्या अत्यंत बिकट आहे. ही बाब ओळखून या प्रभागाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रभागाचे सुपुत्र तथा छावा संघटनेचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन भाऊ गायकवाड हे निवडणुकीच्या रणांगणात पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे जाणवत आहे.
प्रभाग क्रमांक 11 मधील शिंपळकर वस्ती येथे गेल्या काही महिन्यापासून विजेच्या जळालेल्या ट्रान्सफार्मरची समस्या सर्व शेतकऱ्यांना भेडसावत होती. पुरेशा वीजेच्या दाबाअभावी उभी पिके जळून जात होती. त्यामुळे प्रभागातील शेतकरी बांधवांनी ही व्यथा या प्रभागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार तथा भावी नगरसेवक सुदर्शन गायकवाड यांच्याकडे मांडली. महावितरणचा मार्च एंड सुरु असल्यामुळे पाठपुरावा करूनही विजेच्या ट्रान्सफार्मर बदलण्यास विलंब लागेल. ही बाब  गायकवाड यांनी ओळखली. तासाभरात घोषणा मिनिटात निर्णय आणि काही सेकंदात अंमलबजावणी या धोरणाने चालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीला साजेसा निर्णय सुदर्शन गायकवाड यांनी घेतला. काही क्षणातच त्यांनी स्वखर्चातून ट्रान्सफार्मर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. काही तासातच हा ट्रान्सफार्मर स्वतःच्या वाहनात त्वरीत आणुन खांबावर बसवुन शेतकर्‍यांचा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांनी स्वखर्चातून ट्रांसफार्मर बसवल्यानंतर सुरू झालेले विजेच्या पंपातून आलेले पाणी पाटाद्वारे वाहत असलेले पाहून गायकवाड यांना कृतार्थ समाधान वाटले. यापुढील काळात प्रभागातील कोणतीही समस्या प्रलंबित राहणार नाही काही क्षणात ती निश्चितपणे सोडवली जाईल असा विश्वास यावेळी सुदर्शन गायकवाड यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला. 
प्रभाग कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला आहे याला महत्त्व नाही. तर प्रभागाच्या हितासाठी कोणता का काय भुमिका घेतो ? याला महत्त्व आहे. त्यामुळे या पुढील काळात या प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः 24 तास वचनबद्ध राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभागाची सेवा करण्यासाठी मी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले असून प्रभागातील कोणत्याही स्वरूपाची अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे. गेल्या काही वर्षापासून प्रभागातील सर्व समस्यांचा अभ्यास मी केला असून सर्व समस्या आवश्यकतेनुसार प्राधान्याने निश्‍चितपणे सोडवल्या जातील. माझे राजकीय मार्गदर्शक माजी आ. राजन पाटील मोहोळचे दक्ष आ. यशवंत तात्या माने, युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रभागाचा चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाही.
सुदर्शन गायकवाड
युवा नेते
इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस

Reactions

Post a Comment

0 Comments