Hot Posts

6/recent/ticker-posts

अखेर श्रीपूर म्हाळूंग ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले- धैर्यशिल मोहिते पाटील

 अखेर श्रीपूर म्हाळूंग ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले- धैर्यशिल मोहिते पाटील

अकलूज  (कटुसत्य वृत्त ) :- आपल्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतरीत व्हावे या करता गावातील नागरिकांनी नेते मंडळीनी सामजस्यांची भूमिका घेत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार टाकला आज तो बहिष्कार फळाला आला जनतेच्या ऐक्याचा विजय झाला आणि श्रीपूर म्हाळूंग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतरीत झाले असे गौरवोद्गार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त करीत श्रीपूर म्हाळूंगच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
      पुढे मोहिते पाटील म्हणाले की आ. रणजितसिंह मोहीते पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीपूर म्हाळूंगच्या जनतेसाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून एक नवा विकासाचा अध्याय सुरू होणार आहे. पण त्याच बरोबर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तालुक्यातील नातेपुते, अकलूज ग्रामपंचायतींचे देखील नगरपालिकेत रूपांतरीत होणार होते. ग्रामपंचायतीचे नगरपालिकेतील रूपांतर अंतिम टप्प्यात असताना फक्त विरोधाला विरोध करून स्वार्थी वृत्तीमुळे ग्रामपंचायतीची निवडणूक अकलूजच्या जनतेवर लादली गेली. त्यांच्यामुळेच नगरपालिकेस अडथळा निर्माण होऊन अकलूजकरांना विकासापासून ग्रामउद्धारा पासून वंचित राहवे लागत आहे. याचेच दुःख जास्त आहे. अशी भावना व्यक्त केल्या तर मात्र इथे एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की, महाविकास आघाडी शासनाने तालुक्यातील नातेपुते अकलूज ग्रामपंचायतींचे नगरपालिका मध्ये रूपांतर अंतिम टप्प्यात असताना नगरपालिके बाबतचे नोटिफेकश का काढले नाही? हे उघडपणे जाणीवपूर्वक नातेपुते व अकलूजकरांच्या विकासाच्या बाबतीत नतद्रष्ट मतीभ्रष्ट मतीभंग पावलेल्या दुस-यांच्या तालावर नाचणा-या आपमतलबी नेत्यांनी केलेले षडयंत्र आहे. ज्याप्रमाणे श्रीपूर म्हाळूंगच्या जनतेने एकीचे बळ दाखले त्याच प्रमाणे नातेपुते अकलूजकरांनो आपण सर्वांनी आपल्या ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी एकीचे बळ दाखवले पाहीजे आपला कोण परका कोण हा फरक जाणा स्वार्थी वृत्तीला थारा देता कामा नये असेही धैर्यशील मोहीते पाटील म्हणाले.


Reactions

Post a Comment

0 Comments