छत्रपती संभाजी महाराज चौकात बळीराजाचे पूजन ‘येडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे’ घोषणांनी परिसर दुमदुमला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि शिव मावळा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन उत्साहात पार पडले. ‘येडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे!’ या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील साहेब यांनी बळीराजाच्या कार्याची आणि त्याच्या राज्याच्या आदर्शाची प्रेरणादायी माहिती दिली.
या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व महिलांना पारंपरिक फेटे बांधून सन्मान करण्यात आला आणि बळीराजाच्या प्रतिमेस अभिवादन व जयघोष करण्यात आला. उत्कृष्ट नियोजन आणि सुसंवाद यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, सचिव महाडिक सर, हनुमंत पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिल्हा उपाध्यक्ष अजयसिंह सौंमदळे, अविनाश गोडसे, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उज्वला साळुंखे मॅडम, लताताई ढेरे, अभिंजली जाधव, रूपाली ननवरे, सुप्रिया पवार (क्षिरसागर), वैशाली शिरसागर, वर्षाराणी पवार, सानिका पवार, वैशाली क्षिरसागर, सौ. सुरवसे, सौ. वडणे, सौ. पाटील, सौ. जाधव, सुवर्ण महाडिक, मनाली जाधव, अंजली सुरवसे, तसेच गोवर्धन गुंड, रमेश जाधव, प्रीतम भैय्या परदेशी, ब्रह्मदेव पवार, राम माने, राजू व्यवहारे, कल्याण गव्हाणे, जयसिंगराव भोसले, नागेश वडणे, सचिन चव्हाण, परशुराम पवार, प्रकाश डोंगरे, कुमार शिरसागर, नितीन जाधव, गजानन साळुंखे, प्रकाश जाधव, दत्ता जाधव, नितीन मोहिते, मल्लिकार्जुन मेडीदार, मोहन खमीतकर, नंदू पानादी, पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले आणि बळीराजाच्या कार्यातून समाजासाठी प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

0 Comments