Hot Posts

6/recent/ticker-posts

शासनाने घालून दिलेल्या नियमांचा पालन करा -- करणकोट

 शासनाने घालून दिलेल्या नियमांचा पालन करा -- करणकोट



सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पुन्हा एकदा नवीन नियमावली तयार केली असून त्याचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी म्हणाले.
उदगिरी हाऊस कुंभार वेस येथे आयोजित केलेल्या कुंभार वेस व्यापारी असोसिएशनने आयोजित केलेल्या छोट्याशा बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी जोडभावी पेठ पोलिस चौकीचे उपनिरीक्षक केतन मांजरे तसेच असोसिएशनचे अध्यक्ष महादेव तोग्गी, उपाध्यक्ष रविकांत तंबाके सचिव संतोष उदगिरी हे उपस्थित होते.
यावेळी व्यापारी चन्नवीर दुलंगे, शिवानंद सावळगी, प्रवीण ओनामशेट्टी या व्यापाऱ्यांनी येणाऱ्या अडचणी बैठकीत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना करणकोट यांनी योग्य प्रकारें मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना रविकांत तंबाके यांनी केले तर आभार शिवानंद सावळगी यांनी मानले तर सूत्रसंचालन संतोष उदगिरी यांनी केले.
या बैठकीत चर्चासत्र घेण्यात आला. कमीत कमी व्यापारी बंधूंच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली उर्वरित बंधूंना सर्व सूचना कळवावे असे असोसिएशनच्या वतीने आवाहन करण्यात आले कोविडची काळजी घेऊनच व्यापार करावे असे सर्वानुमते ठरले.


Reactions

Post a Comment

0 Comments