Hot Posts

6/recent/ticker-posts

आधार योगा ग्रुप व श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे गुणवंत महिलांचा सत्कार

 आधार योगा ग्रुप व श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे गुणवंत महिलांचा सत्कार

                           

सोलापूर  (कटुसत्य वृत्त ) :-  आधार योगा ग्रुप आणि राजेश कोठे नगर येथील श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिलादिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वसुंधरा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर वासंती पांढरे ,पतंजलीच्या जिल्हा महिला विभागाच्या प्रभारी सुजाता शास्त्री , कोविड योद्धा परिचारिका विटाबाई घुले आणि एम बी बी एस शिकत असलेल्या जाधव आणि मस्के या दोन तरुणी अशा सर्वांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे होते. योग प्रशिक्षक भगवान बनसोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, प्रास्ताविकात बनसोडे म्हणाले की ,जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आधार योगा ग्रुपच्या पुरुष सदस्यांनी आयोजित केला आहे. एप्रिल महिन्यात सात दिवसांचे योगा महाशिबीर आयोजित करण्यात येणार आल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात मुलांना संस्कार कसे करावे,घरातील महिलांची जबाबदारी आणि हक्क या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे कि  नारी शक्ती पुरुष शक्ती पेक्षा बलशाली आहे सक्षम आहे म्हणूनच महिलांकडे मातृत्व हा अधिकार दिला गेला आहे. बाराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत जनाबाईना सर्व संतांचे प्रमुख केले. वारकरी संप्रदायामध्ये पुरुष आणि महिला हा भेद वेगळा मानला जात नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण शिरसाट  यांनी केले. तर लिंगप्पा गडदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विजय जगताप, शंकर चौगुले,श्रीराम मुद्दे, विलास चिंचोळकर,आदर्श इंगळे, रंगा दिवटे, सदाशिव बंदपट्टे ,रमेश धोत्रे,शिवाजी जाधव,आबा चव्हाण,नाना कुरडे,शरद भांगे,श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान अध्यक्ष संजय केसरे आदी प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.तसेच सोनी नगर,आशीर्वाद नगर,शेटे नगर,प्रतीक्षा बंगलो,राजेश कोठे नगर,निराळे वस्ती आदी भागातील महिला उपस्थित होत्या.

Reactions

Post a Comment

0 Comments