Hot Posts

6/recent/ticker-posts

महादेवराव जानकर यांची माऊली कलेक्शनला सदिच्छा भेट

 महादेवराव जानकर यांची माऊली कलेक्शनला सदिच्छा भेट



सांगोला  (कटुसत्य वृत्त ) :-  महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महादेवरावजी जानकर साहेब यांनी सांगोला शहरातील सुप्रसिद्ध कापड दुकान माऊली कलेक्शनला सदिच्छा भेट दिली. यावेळी जानकर साहेब यांचा सत्कार माऊली कलेक्शनचे मालक नवनाथ लवटे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. सदर भेटी प्रसंगी जानकर साहेब यांनी व्यवसायात केलीली प्रगती व नवीन आव्हाने याच्यावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील मुलांनी व्यवसायात उतरून प्रगती करावी असा सल्ला उपस्थितांना  दिला. सत्कार समारंभानंतर जानकर यांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करावी व लोकांच्या अडीअडचणी सोडवाव्यात असे सांगितले. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हा उपेक्षित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच स्थापन केला असून पक्षाचा वाढीसाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन केले.   
                सदर भेटी प्रसंगी ॲड. शंकरराव सरगर ,  बिरदेव शिंगाडे, सम्राट सेना सरसेनापती प्रा. बाळासाहेब सरगर, कांतीलाल ढेरे, नागनाथ मदने,  प्रभाकर रुपनर, लोटेवाडी ग्रामपंचायतचे नूतन सदस्य संभाजी लवटे, नवनाथ मदने, प्रशांत जाधव, दिपक लाटणे, सामाजिक कार्यकर्ते दाजी लवटे  व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments