पंढरपूर येथील छत्रपती चषकमध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमीचे घवघवीत यश ; ओम आनंदा माने ठरला सामनावीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 25, 2020

पंढरपूर येथील छत्रपती चषकमध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमीचे घवघवीत यश ; ओम आनंदा माने ठरला सामनावीर

पंढरपूर येथील छत्रपती चषकमध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमीचे घवघवीत यश ; ओम आनंदा माने ठरला सामनावीर

पंढरपूर (कुटूसत्य. वृत्त.): पंढरपूर या ठिकाणी स्वेरीमध्ये छत्रपती चषक या नावाने क्रिकेट स्पर्धा चालू असून कालचा सामना हा राजमाता क्रिकेट अकॅडमी सांगोला विरुद्ध समर्थ क्रिकेट क्लब परभणी या दोन संघामध्ये खेळला गेला होता. यामध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमी सांगोला या संघाने 9 विकेट राखत एकतर्फी विजय मिळविला. या विजयामुळे राजमाता क्रिकेट अकॅडमी हा संघ सेमी फायनलमध्ये पोहचला आहे.

या सामन्यामध्ये ओम माने हा खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरला असून त्याने 5.5 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 5 विकेट मिळवत 2 ओव्हर निर्धाव टाकल्या आहेत. तसेच अष्टपैलू खेळी करत ओंकार गरांडे यांनी 3 विकेट घेऊन नाबाद 52 धावा काढल्या आहेत. विशाल मिसाळ आणि हर्षराज जगताप या खेळाडूंनीही सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून प्रशांत काशीद सर, अक्षय जाधव सर, रणजित गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages