सांगोला नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1 कोटी 42 लाखाचे अनुदान वाटप
![]() |
नगराध्यक्षा सौ. राणीताई माने |
शहरातील 159 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा
सांगोला (कुटूसत्य. वृत्त.): प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावनी 2018 पासुन सुरू आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थांना राज्य शासनाचे 1 लाख व केंद्र शासनाचे 1.50 लाख असे एकुन 2.50 लाख अनुदान वितरीत करण्याची तरतुद आहे. सांगोले नगरपरिषदेकडुन बांधकाम सुरू असणा-या लाभार्थ्यांना राज्य शासनाचा 1 लाखाचा हप्ता यपुर्वीच वितरीत करण्यात आला आहे. परंतु केंद्र शासनाच्या निधी अभावी योजनेतील घरकुलांची कामे रखडली होती. सांगोले नगरपरिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाचा निधी नगरपिषदेस प्राप्त झाला आहे. सदर केंद्र शासनाचा हिस्सा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आला आहे. एकुन 161 लाभार्थ्यांना त्यांच्या बांधकामाच्या टप्या नुसार एकुन 1 कोटी 42 लाख 40 हजार रुपये अनुदानाचे वितरण केल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. कैलास केंद्रे यांनी दिली.
सांगोला नगरपरिषदेस प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1606 घरकुलांचे उद्दीष्ट प्राप्त असुन आज अखेर 4 सविस्तर प्रकल्प अहवालातुन एकुन 423 घरकुलांना शासनाकडुन मंजुरी मिळाली आहे. मंजुर घरकुलां पैकी 158 घरकुलांचे बांधकाम स्लॅब लेवल पर्यंत पुर्ण झाले आहेत. तसेच आज अखेर 64 घरकुले पुर्ण झाली आहेत. नगरपरिषदे मार्फत या निधीचे वितरण करण्यात आल्याने रखडलेली घरकुलांची कामे सुरु होवुन आर्थिक संकटात सापडलेल्या लाभार्थ्यां मधुन समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच अध्याप ज्या लाभार्थ्यांनी घरकुलांची बांधकामे सुरू केली नाहीत अशा लाभार्थ्यांनी त्वरीत बांधकामास सुरवात करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मुख्याधिकारी यांनी केले.
मागील काही महिन्यांपासुन केंद्र शासनाच्या निधी अभावी तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरकुलांची कामे थांबली होती. नगरपरिषदेस केंद्र शासनाचा निधी उपलब्ध झाला असुन अनुदान रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. (लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. राणीताई आनंदा माने)
घरकुलांची बांधकामे पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांने त्वरीत नगरपरिषदेकडुन वापर परवाना मिळवून, योजनेचे नाव घरकुलांवर टाकुन शेवटच्या हप्त्यासाठी अर्ज करावा, जेणेकरुन अंतिम हप्ता नगरपरिषदेस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणे सोईस्कर होईल. (मुख्याधिकारी श्री. कैलास केंद्रे, सांगोला नगरपरिषद)
0 Comments