अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या कामाला गती द्या

शिवसेना युवा नेते नागेश वनकळसे यांनी घेतली शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट
मोहोळ ( कटूसत्य वृत्त ):- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे कामाला गती देण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोहोळ तालुक्याचे शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांनी भेट घेतली
याबाबत माहिती अशी की पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि भव्य स्मारक बसविण्याचे शासनाने ठरवले आहे , भव्य दिव्य स्मारक बसविण्याचा निर्णय येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे कार्य हे समतेचे आणि न्यायिक होते.म्हणून न पूर्णाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे काम भव्य दिव्य व्हावे अशी अपेक्षा तमाम जनतेची आहे यासाठी नामदार उदय सामंत यांच्याकडे विनंती करण्यात आली .
याबाबत सविस्तर बोलताना नागेश वनकळसे म्हणाले सकल धनगर समाजाचे नेते गणेश गावडे आणि बिरुदेव देवकते हे ही शासनाकडे स्मारकाचे काम गतिमान व्हावे म्हणून शासनदरबारी प्रयत्न करीत आहेत त्यांनीही एक शिवसैनिक म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करत रहा असे सुचविले होते आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर समस्त भारतीयांचे भूषण आणि प्रेरणा आहेत, त्यांचा आदर्श सर्व जातीधर्माने घ्यावा असे त्यांचे कार्य उतुंग असल्याचे मत नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले .
राजमाता अहिल्यादेवी यांच्या ३१ मे रोजी असणाऱ्या जयंती पूर्वीच स्मारकाच्या कामाला गती मिळावी जेणेकरून संबंध जिल्ह्यात आणि विद्यापीठात राजमाता यांची जयंती साजरी करता यावी म्हणून स्मारकाच्या कामाला ३१ मे पूर्वी गती प्राप्त होण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असल्याचे नागेश वनकळसे यांनी सांगितले. याबाबत मंत्री महोदयांच्या प्रतिसादाबद्दल श्री वनकळसे म्हणाले की उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करत असून अतिशय आकर्षक आणि देखणे स्मारक उभे करण्यासाठी शासन यावर काम करत आहे आणि लवकरच याला मूर्त स्वरूप येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निवेदनावर उत्तर दिले असल्याचे सांगितले .
सकल धनगर समाज आणि समस्त जनतेची प्रामाणिक इच्छा आहे की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात व्हावे यात पुढे होऊन शासन दरबारी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे.
गणेश गावडे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सदस्य
0 Comments