मोहोळ तहसिल कार्यालयांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): तहसिल कार्यालय पुरवठा शाखा कार्यालय मोहोळ यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमांच्या प्रसंगी निवासी नायब तहसिलदार लीना खरात यांच्या शुभहस्ते भारत वासियांचा अभिमान व ग्राहक चळवळीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मोहोळ तालुका अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, तालुका संघटक दत्तात्रय कुलकर्णी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या परिवहन व प्रवासी विभागाच्या कांता गुंड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत महसूल विभागाचे यशोदा कांबळे, सहसचिव फुलचंद सरवदे, कार्यकारणी सदस्य यशवंत गावडे , अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका सचिव तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य राजन घाडगे, अभियंता महावीर कोळेकर आदि. प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
वस्तू खरेदी करते वेळी ग्राहकांनी जागरुक राहून खरेदी करणे अपेक्षित आहे ग्राहकांनी वस्तु खरेदी केलेची पावती घ्यावी यामुळे फसगत झाल्यांस ग्राहकांना दाद मागता येईल असे मनोगत निवासी नायब तहसिलदार लीना खरात यांनी व्यक्त केले. यावेळी मुकुंद कुलकर्णी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य राजन घाडगे यांनी ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य यांची माहिती विशद केली.
यावेळी पुरवठा शाखा कार्यालयाच्या लिपीक श्रीमती सुरवसे, कुंभार, पाटील, गाडे, सादिक शेख यांनी कार्यक्रमांचे उत्तम नियोजन केले तर शेवटी आभार श्रीमती सुरवसे यांनी मांडले.
0 Comments